भिवंडी - भिवंडी शहर व ग्रामीण भागात क्षेत्रात स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणात हुक्का पार्लर सुरू असल्याने शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी हुक्का पार्लरमध्ये जाऊन नशेचे शिकार होत आहेत. या नशेखोरीमुळे शहरात चोरीचे प्रमाण वाढले आहे. या अवैध हुक्का पार्लर धंद्यांना स्थानिक पोलिसांचे पाठबळ मिळत असल्याने हुक्का पार्लरवर कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे. या अवैध हुक्का पार्लरमुळे तरुण पिढी बरबाद होत असल्याने पालकवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून युवकांचे जीवन वाचवण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे. भिवंडी पोलीस उपायुक्त परिमंडळ -2 अंर्तगत येणारे पोलिस स्टेशन कोनगांव , नारपोली , निजामपुरा, शांतिनगर , शहर पोलिस स्टेशन व भोईवाडा पोलिस स्टेशन तसेच तालुका पोलीस ठाण्याच्या अंर्तगत ठिकठिकाणी अवैध हुक्का पार्लर मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. असा आरोप होत आहे. शांतिनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील औचितपाडा येथील फरीद आर्केड बिल्डिंगच्या समोर बुलेट ढाबामध्ये स्मोक सिटी,दांडेकर वाडी शिवास हॉटेलच्या मागे, आमपाड़ा बकरा बाजार,काशिमपुरा कब्रस्तानच्यामागे , नागांव हनुमान मंदिरच्या मागे, जब्बार कम्पाउंड तलावाजवळ तसेच तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महामार्गांवर असलेला धाबे व हॉटेलमध्ये सर्रासपणे हुक्का पार्लर सुरू आहेत.त्यामुळे हे अवैध हुक्का पार्लर तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात येत आहे. कोरोनामुळे शाळा व महाविद्यालय बंद असल्याने तरुणपिढी हुक्का पार्लरमुळे बरबाद होत असल्याने सदरचे अवैध हुक्का पार्लर त्वरित बंद करण्याची मागणी होत होत आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
शोविकचा मित्र सूर्यदीपचे बॉलिवूड, अंडरवर्ल्ड कनेक्शन असण्याची शक्यता
प्रशांत भूषण यांनी भरला १ रुपयाचा दंड अन् सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका
दिशा सालियान आणि सुशांत राजपूत मृत्यू यामधील रोहन रॉय महत्त्वाचा दुवा; नितेश राणेंचा दावा
सुशांतची आत्महत्या की हत्या?, लवकरच पोस्टमॉर्टेम - व्हिसेरा अहवालातून होणार खुलासा
धक्कादायक! क्वारंटाईन सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग
Breaking : शिक्षकाचा वेतन मिळत नसल्याने आमदार निवास येथे आत्महत्येचा प्रयत्न
सुशांत आणि दिशाच्या मृत्यूचा थेट संबंध, नितेश राणेंनी लिहिले अमित शहांना पत्र
बलात्कारास विरोध केल्याने काकाने चिमुकलीचे केली हत्या, कुजलेल्या मृतदेहावर आढळल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या खुणा