मुंबई - राज्य पोलीस दलात विविध घटकामध्ये कार्यरत असलेल्या ५०० सहाय्यक पोलीस निरीक्षकांना बढती देण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील दिडशेवर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आता निरीक्षकांच्या सहाय्यक आयुक्त/ उपअधीक्षक म्हणून बढतीचे आदेश केव्हा निघणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.सोमवारी रात्री सहाय्यक निरीक्षकांच्या बढतीचे आदेश पोलीस मुख्यालयातून आदेश जारी करण्यात आला. काही वर्षापासून प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात सहाय्यक निरीक्षकांची एकाचवेळी पदोन्नती देण्यात आलेली आहे. गेल्या दोन वर्षापासून या अधिकाऱ्यांच्या बदल्या प्रलंबित होत्या. त्याबाबत संबंधितांमध्ये नाराजीचे वातावरण होते. बढती मिळालेल्या मुंबई, ठाणे आयुक्तालयातील बहुतांश अधिकाऱ्यांना त्याच घटकामध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे.