पणजी - जागतिक पर्यटन स्थळ म्हणून विकसीत होत असलेला गोवा हे वेश्या व्यवसायाचा अड्डा बनविण्याच्या दृष्टीनेही दलालांची लॉबी कार्यरत आहे. वेश्या व्यवसायासाठी हरमल पेडणे येथे एक बंगलाच भाड्याने घेवून तो वेश्या व्यवसायासाठी वापरण्यात आला. गुन्हा अन्वेषण विभागाच्या छाप्यानंतर ही गोष्ट उघडकीस आली आहे. या प्रकरणात महिला दलालाला अटक करण्यात आली आहे तर तिघा युवतींची सुटका करण्यात आली आहे.
मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास केलेल्या या कारवाईत पोलिसांनी मैना या टोपणनावाने हा धंदा चालविणाऱ्या महिला दलालाला पुराव्यासह अटक केली. त्या ठिकाणी वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या तीन युवतींची पोलिसांकडून सुटका करण्यात आली. त्यांना मेरशी येथील सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. सुटका करण्यात आलेल्या तीन युवतींपैकी एक दोन युवती या मुंबईच्या आहेत तर तिसरी युवती ही अहमदनगर जिल्ह्यातील आहे. पोलीस कारवाई करून युवतींची मंगळवारी रात्री सुटका करण्यात आली असली तरी त्या तीन दिवसांपूर्वीपासूनच या बंगल्यात राहत होत्या अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. गिऱ्हाईक मिळविण्याचे काम आॅनलाईन पद्धतीने चालू होते. अटक करण्यात आलेली महिला दलाल त्यात महत्त्वाची भूमिका बजावत होती. पैशांचे व्यवहारही तीच करीत होती अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
गुन्हा अन्वेषण विभागाला ही माहिती मिळताच निरीक्षक विश्वेश कर्पे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या बंगल्यावर छापा टाकला आणि दलाल महिलेला अटक केली. तसेच युवतींची सुटका केली. एकीला अटक करण्यात आलेले असले तरी एवढा मोठा व्याप हा एक महिला सांबाळू शकणार नाही आणि या रेकेटचे आणखी सूत्रधारही आहेत याची पोलिसांना कल्पना आहे. तूर्त संशयि महिलेला ५ दिवसांच्या रिमंडवर पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
मैना नायक ऊर्फ तबसूम अली
या संपूर्ण सेक्स रेकेटच्या तपासाचा केंद्रबिंदू बनलेल्या संशयित मैना नायक ऊर्फ तबसूम मसशैद अली हिला अटक करून ५ दिवसांची कोठडीही मिळविली आहे. बंगल्यात ठेवल्या गेलेल्या युवती गोव्यात कुणी आणल्या. बंगला भाड्याने घेण्यासाठी व्यवहार व करार कूणी केले, गिऱ्हाईकांशी कोण संपर्क करतो अशा अनेक प्रश्नांची माहिती उत्तरे तिच्याकडून पोलीस मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत.