नागपूर : मनोरुग्ण मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला २० वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावण्यात आली. तसेच, एकूण सात हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. सी. राऊत यांनी मंगळवारी हा निर्णय दिला. ही घटना काटोल येथील आहे.
राहुल उर्फ पिंटू भीमराव लांबघरे (२५) असे आरोपीचे नाव असून तो येरला धोटे येथील रहिवासी आहे. व्यवसायाने मजूर असलेल्या लांबघरेने २३ फेब्रुवारी २०१७ रोजी दुपारी ४ च्या सुमारास पीडित मुलीच्या आजूबाजूला कोणीच नसल्याचे पाहून तिच्यावर बलात्कार केला. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. वर्षा सायखेडकर यांनी कामकाज पाहिले. त्यांनी आरोपीविरुद्ध ९ साक्षीदार तपासले. तसेच, इतर विविध पुराव्यांच्या आधारावर संबंधित गुन्हे सिद्ध केले.
अशी आहे पूर्ण शिक्षा१ - भादंवि कलम ३७६ (२)(१) (बलात्कार): २० वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास.२ - कलम ४५२ (घरात बळजबरीने प्रवेश) : दोन वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास.