गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई - कांदिवलीत एका रिसेप्शनिस्टला सातत्याने लॅण्डलाइनवर फोन करून अश्लील संभाषण केल्याप्रकरणी राजीव सुभाष भाटिया (३६) या विकृत कॉम्प्युटर इंजिनीअरला मंगळवारी पुण्यातून समतानगर पोलिसांनीअटक केली.
भाटियाने मास्टर्स इन कॉम्प्युटर केले असून पुण्यात एका बहुराष्ट्रीय कंपनीत तो कामाला होता. कांदिवलीतील एका खासगी रुग्णालयात अठ्ठावीस वर्षांची तरुणी रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते. गेल्या अनेक दिवसांपासून दुपारी चारच्या सुमारास रुग्णालयाच्या लॅण्डलाइनवर एक इसम फोन करून तिच्यासोबत अश्लील भाषेत संभाषण करायचा. यामुळे कंटाळलेल्या तरुणीने समतानगर पोलिसांना लेखी तक्रार दिली होती. पोलिसांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, रुग्णालयातील फोनला कॉलरआयडी लावून घेण्यात आला. फोन करण्याचे सत्र सुरूच असले तरी तो इंटरनेटवरून कॉल करीत असल्याने त्याला पकडण्यात अडथळे येत होते. एक दिवस त्याने त्याच्या मोबाइलवरून फोन केला. तेव्हा त्याचा नंबर रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना दिला आणि तो अडकला. मोबाइल क्रमांकाच्या मदतीने त्याचा सीडीआर आणि पत्ता पोलिसांना सापडला. त्यानुसार पुण्यातील शीरगावच्या परंदवाडी पोलीस चौकीच्या मदतीने त्याला अटक करण्यात आली.
धक्कादायक! गोव्यात युवतीवर बलात्कार करून हत्या
धक्कादायक! प्रियकराचा प्रेयसीच्या पंधरा वर्षीय मुलीवरच बलात्कार
भाटियाला संगणकाचे उत्तम ज्ञान असल्याने त्याचा फायदा उचलत तो रुग्णालयासह, हॉटेल तसेच शॉपिंग सेंटरच्या लॅण्डलाइनवर फोन करायचा. गुगल डेटा वापरत तो हे क्रमांक मिळवायचा. या तरुणीबरोबरच अनेक तरुणी तसेच महिलांना फोन करत त्यांच्याशी अश्लील संभाषण केल्याची कबुली त्याने दिली.