शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

फाउंटन हॉटेल चालकाविरोधात पोलीस ठाण्यावर धडक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2019 9:51 PM

ठाण्यासह पालघर जिल्ह्यातील आगरी समाजाच्या प्रतिनिधींनी काशिमीरा पोलीस ठाण्याला घेराव घालून संताप व्यक्त केला.

ठळक मुद्देपोलीसांनी हॉटेलच्या ३६ जणांना तर गावातील ८ जणांना अटक केली होती. गावातील लोकांवर अन्याय कराल तर ते खपवून घेतले जाणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला.

मीरारोड - पान खाण्यासाठी गेलेल्या घोडबंदर गावातील मुलांना दुचाकी लावण्यावरुन फाऊंटन हॉटेलच्या बाऊंसर, कर्मचारायांनी केलेल्या मारहाणी वरुन उसळलेल्या दंगलीचे संतपत पडसाद आगरी समाजात उमटले आहेत. ठाण्यासह पालघर जिल्ह्यातील आगरी समाजाच्या प्रतिनिधींनी काशिमीरा पोलीस ठाण्याला घेराव घालून संताप व्यक्त केला. हॉटेल मालक भाजपाचा असल्याने पोलीस आणि पालिका त्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप करत आगरी समाज दादागिरी खपवून घेणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.शुक्रवारच्या मध्यरात्रीनंतर काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीतील वरसावे नाका येथे असलेल्या फाऊंटन हॉटेलवर पान खाण्यासाठी गेलेल्या घोडबंदर गावातील तरुणांना त्यांची दुचाकी उभी करण्यावरुन हॉटेलचे बाऊंसर, रखवालदार आदींनी शिवीगाळ करत दमदाटी, मारहाण केली. याची माहिती गावात कळताच गावातील रहिवाशी हॉटेलवर गोळा झाले. तर हॉटेलचे कर्मचारी देखील मोठ्या संख्येने जमले होते. वादावादी वाढत जाऊन त्याचे पर्यवसन तुंबळ हाणामारी, दगडफेक, सोडा वॉरच्या बाटल्या फेकण्यात झाले. यात ग्रामस्थांसह एक पोलीस जखमी झाला. पोलीसांनी हॉटेलच्या ३६ जणांना तर गावातील ८ जणांना अटक केली होती.दरम्यान या घटनेचे पडसाद आगरी समाजात उमटले. आज सोमवारी शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांच्यासह आगरी समाजाचे प्रमुख शांताराम ठाकुर, सुरेश पाटील, प्रभाकर म्हात्रे, केशव घरत, चिंतामण पाटील, राजु ठाकुर तसेच मोठ्या संख्येने पालघर - ठाण्याचे आगरी समाजाचे पदाधिकारी, ग्रामस्थांनी काशिमीरा पोलीस ठाण्याला घेराव घातला.या वेळी फाऊंटन हॉटेलचा मालक तलाह मुखी स्वत: घटनेत सहभागी असल्याचे सांगत मुखी हा भाजपाचा असल्याने त्याला पोलीस, पालिका आदी संरक्षण देत असल्याचा आरोप आगरी समाजाच्या प्रतिनिधींनी केला. सदर हॉटेल आदिवासींच्या जागेवर असुन बेकायदा बांधकाम आणि खोट्या परवानग्या घेतल्या आहेत. यांचेच दिल्ली दरबार इन हे गॅरेजच्या परवानगीच्या नावाखाली घोडबंदर येथेच बेकायदा हॉटेल आहे. रात्रभर ही हॉटेलं कशी चालतात ? असा सवाल करत या ठिकाणी गैरप्रकार चालत असल्याचे आरोप ग्रामस्थांनी केले.पानखाण्यासाठी गेलेल्या गावातील मुलांना केवळ दुचाकी उभी करण्या वरुन इतकी गुंडगीरी करणाराया हॉटेलवाल्याकडे शस्त्रे आली कुठून याचा शोध घ्या. हॉटेल मालक आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करुन अटक करा. गावातील मुलांना गंभीर जखमा झाल्या असुन त्यानुसार कलमं लावा, गावातील लोकांवर अन्याय कराल तर ते खपवून घेतले जाणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला.यावेळी उपस्थित पोलीस उपअधिक्षक शांताराम वळवी, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक व्यंकट आंधळे, काशिमीरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक वैभव शिंगारे यांनी आगरी समाज व ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकुन घेतले. यावेळी पोलीस कोणावरही अन्याय होऊ देणार नाही असे वळवी यांनी आश्वास्त केले. जखमींचे वैद्यकिय अहवाल येतील त्या प्रमाणे कलमं लावली जातील. कायद्या नुसार कारवाई करु अशी ग्वाही वळवी यांनी दिली. पोलीसांनी या प्रकरणात एकुण तीन गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस आणि ग्रामस्थांच्यावतीने तसेच हॉटेल चालकाच्यावतीने दिलेल्या फिर्यादीनुसार हे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

टॅग्स :mira roadमीरा रोडhotelहॉटेलPoliceपोलिस