शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली; सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे"
2
बाबा सिद्दिकींच्या जवळचाच कोणीतरी हल्लेखोरांना माहिती देत होता? पोलिसांना संशय, दोन आरोपी ताब्यात
3
Supriya Sule : "राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा..."; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट
4
रामलीलामध्ये कुंभकर्णाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा हार्ट अटॅकने मृत्यू, खाली कोसळला अन्...
5
माझ्या गावचा मुलगा, घरकुल नाही आम्ही त्याला चांगले मोठे घर बांधून देणार; अजित पवारांच्या सूरजबाबत मोठ्या घोषणा
6
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर रितेश देशमुखची संतप्त पोस्ट, म्हणाला- "गुन्हेगारांना..."
7
बाबा सिद्दिकींना गोळी लागल्याचे कळताच सलमान, संजय दत्त, शिल्पा शेट्टीची रुग्णालयाकडे धाव
8
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२४; दिलेले पैसे वसूल करता येतील, विवाहेच्छुकांसाठी आशादायी...
9
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
10
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
11
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
12
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
13
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
14
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
15
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
16
पाक-चीन संबंध बिघडविण्यासाठीच ‘ताे’ बाॅम्बस्फाेट
17
गरज पडेल तेव्हा शक्तिनिशी शस्त्रांचा वापर : संरक्षणमंत्री
18
बागमती एक्स्प्रेस दुर्घटना बालासोरसारखीच!
19
ओटीटी कंटेंटवर हवे नियंत्रण, कायदा करा; सिंगल यूज प्लॅस्टिक नको - सरसंघचालक 

नाशिकमध्ये मद्यपी हल्लेखोरांकडून पंक्चर दुकानदाराचा धारधार शस्त्राने भोसकून खून

By अझहर शेख | Published: April 30, 2023 5:05 AM

तीन दिवसांत खुनाची दुसरी घटना

पंचवटी - छत्रपती संभाजीनगर महामार्गापासून टाकळीगावाकडे जाणाऱ्या तपोवन-जेजुरकर मळा रस्त्यावर तिघा मद्यपींनी कुरापत काढून पंक्चर दुकानदाराला त्याच्या दुकानात भोसकून ठार मारल्याची घटना घडली. नाशिक शहरात तीन दिवसांत ही खुनाची दुसरी घटना आहे. 

आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील तपोवन जेजुरकर मळा हा रिंगरोडवर रात्री निर्जन असतो. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या अज्ञात तिघा हल्लेखोरांनी काहीतरी कारणावरून कुरापत काढून पंक्चर दुकानदाराच्या छातीत धारधार शस्त्राने भोसकून खून केल्याची घटना शनिवारी (दि.29) रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यात  मूळ बिहारचा रहिवासी असलेला गुलाम रब्बानी (25) याचा मृत्यू झाला. पंक्चर दुकानदाराचा खून केल्यानंतर संशयित हल्लेखोर फरार झाले होते; मात्र त्यातील एका संशयिताला पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

तपोवन शिवारातील हॉटेल मिरची ते टाकळीरोडकडे जाणाऱ्या जेजुरकर लॉन्स ते रिंगरोडवर साई मोटार गॅरेज अआहे. यागॅरेज बाहेर गुलाम नामक युवकाचे पंक्चर दुकान आहे. शनिवारी रात्री अज्ञात तीन ते चार हल्लेखोरांनी  कुरापत काढून गुलाम याच्या छातीवर धारदारशस्त्राने वार केले. सदर घटनेनंतर जखमी झालेला गुलाम गॅरेजला लागून असलेल्या खोलीकडे रक्तबंबाळ अवस्थेत पळताना जमिनीवर कोसळला त्याला लागलीच उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. 

सदर घटना घडल्यानंतर आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक इरफान शेख, गुन्हे शाखेचे विजय ढमाळ, पोलिस निरीक्षक अनिल शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर, संतोष शिंदे, सुरेश नरवडे, राहुल लभडे, कुंदन राठोड शिवाजी आव्हाड, भास्कर वाढवणे, आदिंसह पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. याठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. खुनाच्या घटनेने पुन्हा एकदा नाशिक हादरून गेले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत आडगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते दरम्यान आडगाव गुन्हे शोध पथक गुन्हे शाखा युनिट वन मध्यवर्ती गुन्हे शाखा अशी विविध पदके हल्लेखोर यांच्या मागावर असून सर्वच पोलीस ठाण्यात नाकाबंदीचे आदेश नियंत्रण कक्षातून देण्यात आले आहे