पुणे : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येपूर्वी पुण्यातील एकाने समाज माध्यमात धमकीचा मजकूर प्रसारित केल्याचे उघडकीस आले आहे. गुन्हे शाखेकडून त्याबाबत सखोल तपास सुरू असून, सिद्दीकी यांच्या खुनाच्या कटाचे धागेदोरे पुण्यापर्यंत पोचत असल्याचे यातून समोर येत आहे.
सिद्दीकी यांच्या हत्येपूर्वीही पुण्यातील वारजेत एका तरुणाने समाज माध्यमात मजकूर लिहिल्याचे आढळल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या संदेशात लाॅरेन्स बिष्णोई, त्याचा भाऊ अमोल बिष्णोई यांच्या नावाने सिद्दीकी यांना धमकावण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. आरोपी शिवाचा पुण्यात भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय हाेता, अशी माहिती तपासात मिळाली आहे.
अकाेटातील लाेणकर भावंडांचा शाेधबाबा सिद्दीकी यांच्या हत्येची व हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याची फेसबुक पाेस्ट शुभम उर्फ शुभू लाेणकर याने अपलाेड केल्याचा संशय पाेलिसांना आहे. त्यामुळे अकाेट तालुक्यातील नेव्हरी येथील लाेणकरचा काही दिवसांपूर्वी बिश्नाेई गँगसाेबत असलेला संपर्क यावरून पाेलिसांनी त्याच्या मूळगावात शाेध घेतला. मात्र, त्याच्यासह भावाने जून २०२४ पासून गाव साेडल्याची माहिती अकोटचे उपविभागीय पोलिस अधिकारी सहायक पोलिस अधीक्षक अनमोल मित्तल यांनी दिली.