पुणे (Pune) शहरातील एका चोराने पोलिसांची झोप उडवली आहे. या चोराने प्रात्यक्षिक करून दाखवलं की, तो लॉक न तोडता किंवा काहीही तोडफोड न करता तुरूंगातून कसा (Accused ran from the lockup) पळून गेला. एका आरोपी तुरूंगातून पळून जाण्यात यशस्वी ठरला होता. त्याला पुन्हा पकडल्यावर तो कसा पळाला याचा खुलासा झाला.
पुणे-नाशिक हायवेजवळ एका पोलीस लॉकअपमधून एक आरोपी गायब झाला. लॉकअपचं लॉक बंद होतं, दरवाज्याच्या लोखंडी सळ्याची बरोबर होत्या. तरीही चोर पळून जाण्यात यशस्वी ठरला होता. चोर पळून कसा गेला? या प्रश्नाने पोलिसही हैराण झाले. पोलिसांच्या टीमने त्या चोराला पुन्हा पकडलं.
(व्हिडीओ क्रेडीट - झी न्यूज)
या चोराला चाकण पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा आणल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी पोलीस हे जाणून घेण्यासाठी उत्सुक होते की, तो पळून गेला कसा? चोरानेही पोलिसांना तो पळून कसा गेला याचा डेमो दिला. हा डेमो पाहून पोलिसही चक्रावले.
काही सेकंदातच चोर सहजपणे कोठडीतून बाहेर आला हे पाहून उपस्थित सगळेच लोक थक्क झाले. हे नाकारता येत नाही की, या चोराने पोलीस सिस्टीमला विचार करायला भाग पाडलं आहे. पोलीस स्टेशनच्या कोठडी आणखी मजबूत करण्याची गरज आहे.