- नितिन पंडीतभिवंडी - पालकाने खाजगी शाळेत शिकणाऱ्या आपल्या पाल्याची शाळेची फी न भरल्यामुळे शाळेतील शिक्षिका व मुख्याध्यापिका यांनी विद्यार्थ्यास वर्गा बाहेर उभे करण्याची शिक्षा देत पालकास धमकाविल्या प्रकरणी भिवंडीत शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कचेरीपाडा येथील मोहम्मद अफाक अल्ताफ सलमानी यांचा अब्दुल रेहमान हा नऊ वर्षांचा मुलगा नागाव येथील विस्डम अकॅडमी या खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेत आहे .त्याने त्याची फी भरली नसल्याने मुख्याध्यापिका शायमा अन्सारी व शिक्षिका बिशमा मॅडम यांनी विद्यार्थ्याने शाळेची फी न भरल्याच्या कारणा वरून हॉल मध्ये एकट्यास उभे करून क्रूर पणाची वागणूक देत शिक्षणा पासून वंचीत ठेवले.तर शिक्षक कासीम यांनी पालकास " आपका बच्चा स्कुल जायेगा तो उसे मारके निकाल देंगे" अशी धमकी दिली.या प्रकरणी पालक मोहम्मद अफाक अल्ताफ सलमानी यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत आपल्या मुलाची कैफियत सांगितली असता पोलीसांनी मुख्याध्यापिका शायमा अन्सारी, शिक्षिका बिशमा मॅडम,शिक्षक कासीम सर यांच्या विरोधात भा.दं.वि.कलम ५०६ ,३४ सह बालअत्याचार प्रतिबंधक कायदा कलमा नुसार गुन्हा दाखल केला आहे.या संपूर्ण गुन्ह्याची खातरजमा करण्यासाठी कसून चौकाशी केली जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी दिली आहे .