जळगाव - एस.टी.बसचा धक्का लागल्याचा आरोप करुन वाहकास मारहाण केल्याच्या प्रकरणात रिक्षा चालक सैय्यद शरीफ सैय्यद रशीद (२४, रा.नशिराबाद) याला दोषी धरुन न्यायालयाने कोर्ट उठेपर्यंत आणि पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस कैदेची शिक्षा सुनावली. दुसरे तदर्थ व सत्र न्यायाधीश सी.व्ही.पाटील यांनी गुरुवारी हा निकाल दिला.
५ डिसेंबर २०१३ रोजी एकनाथ शंकर पाटील हे भादली येथून एस.टी.बस (क्र.एम.एच.२० डी.८३३१) घेऊन येत असताना सायंकाळी ५.३० वाजता शहरातील चौबे शाळेजवळ एस.टी.बसचा रिक्षाला कट लागलेला नसताना सैय्यद शरीफ याने बस वाहक शांताराम दिनेश तिवाने यांना शिवीगाळ करुन मारहाण केली होती. याप्रकरणी चालक एकनाथ पाटील यांच्या फिर्यादीवरुन शनी पेठ पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा व मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता. न्या.सी.व्ही.पाटील यांच्या न्यायालयात हा खटला चालला. त्यात फिर्यादी चालक एकनाथ पाटील, वाहक शांताराम तिवाने, तपासाधिकारी जे.के.अहिरे, वैद्यकिय अधिकारी अशा पाच जणांची साक्ष नोंदविण्यात आली. अतिरिक्त सरकारी वकील मोहन देशपांडे यांनी सरकारच्या बाजुने युक्तीवाद केला. न्यायालयाने पुराव्याअंती कलम ३२३ अन्वये आरोपीला दोषी धरुन शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी म्हणून गणेशकुमार नायकर यांनी काम पाहिले.
अन्य महत्वाच्या बातम्या...
वकिलांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देऊ शकत नाही, राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती
...अन् फेसबुक फ्रेंडनं महिलेला घातला थोडा थोडका नव्हे, तर ११ लाखांचा गंडा
मनोरुग्ण तरुणीवर कारमध्ये अत्याचार; विवस्त्रवस्थेत आढळून आली पीडित तरुणी
कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानची नवीच शक्कल; हायकोर्टाकडून वकील देण्याची मागणी
विकास दुबेला जामीन कसा मिळाला हा मुख्य मुद्दा; सुप्रीम कोर्टानं योगी सरकारला फटकारलं
कोर्टाचा दणका! राजा मान सिंग फेक चकमकप्रकरणी ११ पोलिसांनी जन्मठेपेची शिक्षा
सेक्स रॅकेट चालवणाऱ्या सोनू पंजाबनला कोर्टाने सुनावली २४ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा