शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

Punjab: पंजाब: निवडणुकीच्या धामधुमीत मुख्यमंत्र्यांच्या भाच्याला ED कडून अटक; 8 तास चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2022 9:10 AM

Sand Mining Case: पंजाबमधील निवडणुकीपूर्वी या मुद्द्यावरून राजकारणही तापले आहे. भाच्याच्या घरावर छापा टाकल्यानंतर भाजप, सीएम अमरिंदर आणि इतर पक्षांनी सीएम चन्नी यांच्यावर निशाणा साधला होता.

पंजाब विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत ईडीने मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या भाच्यावर कारवाईचा फास आवळला आहे. भूपिंदर सिंग हनी याला ईडीने अटक केली आहे. अवैधरित्या वाळू उत्खनन प्रकरणी पैशांची अफरातफर केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई रात्री उशिरा करण्यात आली, तसेच त्याची तब्बल ८ तास चौकशी करण्यात आली. 

जालंधरमध्ये ही अटक करण्यात आली. चन्नी यांचा पुतण्या भूपिंदर सिंग हनीच्या घरावरही ईडीने दोन आठवड्यांपूर्वी छापा टाकला होता. हनीच्या दोन साथीदारांच्या ठिकाणांवरही छापे टाकण्यात आले. ईडीला तिघांच्या घरातून जप्त झालेल्या रोख रकमेची चौकशी करायची आहे. छाप्यात हनीच्या घरातून सुमारे ७.९ कोटी रुपयांची रोकड सापडली. त्याचवेळी हनीचा सहकारी संदीप कुमार याच्या ठिकाणाहून दोन कोटी रुपये मिळाले.

भूपिंदरसिंग हनी आणि त्याच्या साथीदारांवर बनावट कंपन्या तयार करून मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप आहे आणि अवैध वाळू उत्खननातही त्यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. भूपिंदर सिंग हनी, कुदरतदीप सिंग आणि संदीप कुमार हे प्रोव्हायडर्स ओव्हरसीज सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक असल्याचे ईडीने उघड केले होते. या कंपनीची स्थापना 2018 मध्ये झाली. बेकायदेशीर खाण प्रकरणी कुदरतदीप सिंग यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल झाल्यानंतर सहा महिन्यांनी हे काम करण्यात आले.

पंजाबमधील निवडणुकीपूर्वी या मुद्द्यावरून राजकारणही तापले आहे. भाच्याच्या घरावर छापा टाकल्यानंतर भाजप, सीएम अमरिंदर आणि इतर पक्षांनी सीएम चन्नी यांच्यावर निशाणा साधला होता. चन्नी यांनी या कारवाईला राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले होते. तसेच यात भाच्याला गोवण्याचा प्रयत्न झाल्याचे म्हटले होते. पंजाबमध्ये या महिन्यात विधानसभा निवडणुकीसाठी 20 फेब्रुवारीला मतदान होणार असून 10 मार्चला निकाल जाहीर होणार आहेत. 

टॅग्स :Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय