चंदिगढ - पंजाबमध्ये होशियारपूरमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांनी एका १९ वर्षीय मुलींचीव हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. मुलीचे प्रेमसंबंध मान्य नसल्याने कुटुंबीयांनी तिची गळा आवळून हत्या केली आणि हत्येची घटना लपविण्याचा कट रचला जात होता. पंजाबपोलिसांनी या प्रकरणी मृत मुलीच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा नोंदवून मुलीची आई बलविंदर कौर, चुलतभाऊ गुरदीप सिंग आणि काका सादेव या तिघांना अटक केली आहे.
मुलीची आई बलविंदर कौरने २२ एप्रिलला मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात नोंदवली होती. घरी न कळवताच मुलगी निघून गेल्याचे तिने तक्रारीत माहिती दिली होती. मुलीच्या आईने अमनप्रीत सिंगवर संशय व्यक्त केला होता. तक्रार नोंदवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुलीची आई बलविंदर कौरने गरशंकर रेल्वे स्थानकावर मुलगी सापडली असून तिला घरी आणल्याचे पोलिसांना सांगितले.
मुलीचे अमनप्रीतबरोबर प्रेमसंबंध होते. अमनप्रीतला भेटण्यासाठी म्हणून त्याच्या घरी गेली होती. कुटुंबीयांनी तिला शोधून काढले आणि स्थानिक पंचायतीच्या हस्तक्षेपानंतर तिला घरी जाण्यास सांगितले, असे पोलीस तपासातून समोर आले आहे. या गुन्ह्यामध्ये शिवराज उर्फ मनी आणि लाला या दोघांचाही सहभाग आहे. ही घटना घडल्यापासून दोघेही फरार आहेत. शिवराज मुलीचा चुलत भाऊ आहे.मुलीची आई, काका आणि चुलत भावाने गुन्ह्याची कबुली दिली आहे. २५ एप्रिलला रात्री बलविंदरने मुलीला झोपेच्या गोळया दिल्या. मुलगी गाढ झोपेमध्ये असताना शिवराज आणि लालाने तिची गळा आवळून हत्या केली. नंतर सत्यदेव, गुरदीपने कोणालाही जाग लागू न देता तिच्यावर अंत्यसंस्कार केले. होशियारपूरचे एसएचओ इक्बाल सिंग यांनी याप्रकरणी माहिती दिली. या घटनेने होशियारपूर पोलिसांच्या उणीवा सुद्धा उघड झाल्या आहेत. कर्फ्यू लागू असताना हा गुन्हा घड़ला कसा अशी चर्चा नागरिकांत सुरु आहे.
पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविलापोलिसांनी नाविकांच्या मदतीने शिवकुमारला शोधले आणि कुटुंबीयांना त्याविषयी माहिती दिली. माहिती मिळताच कुटुंबीयांनी शिवकुमारला सीएचसी मालुली येथे नेले असता डॉक्टरांनी तपासणीनंतर मृत घोषित केले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविला. यासंदर्भात अप्पर पोलिस अधीक्षक असित श्रीवास्तव म्हणाले की, ही बाब कळविण्यात आली आहे, सीओ पातळीवरून चौकशी सुरू आहे.
आणखी महत्वाच्या बातम्या वाचा...
Palghar Mob Lynching : आणखी तीन पोलिसांचे निलंबन तर ३५ जणांची तडकाफडकी बदली
खळबळजनक! प्रेयसीच्या घराच्या उंबरठ्यावर प्रियकराची हत्या; संपूर्ण गाव गेलं हादरून
लॉकडाऊनमध्ये कुटुंबावर आली बेताची स्थिती, कलहातून बेरोजगार मुलाने केली वडिलांची हत्या
Lockdown : जेवण वाटपाच्या बहाण्याने टाकला ज्वेलर्स दुकानावर दरोडा, लुटले कोटी रुपये