चंदीगड:पंजाब पोलिसांनी तरणतारण जिल्ह्यातून तीन दहशतवाद्यांना शस्त्र आणि स्फोटकांसह अटक केली आहे. हे दहशतवादी एक मोठी घटना घडवण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे तीन दहशतवादीपंजाबच्या मोगा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. कुलविंदरसिंग, कमलप्रीत सिंग मान, कंवर पाल सिंह अशी या तिघांची नावे आहेत.
'विनाकारण इतक्या दिवस महाविकासआघाडी सरकारला बदनाम केलं'-अजित पवार
तरणतारणचे एसएसपी उपिंदरजीत सिंग घुमान यांनी याबाबत सांगितले की, पोलीस स्टेशन भिखीविंदचे प्रभारी निरीक्षक नवदीप सिंग भट्टी हे रात्री त्यांच्या टीमसह गस्तीवर होते. जिल्ह्यातील भगवानपुरा गावाजवळ पोलिसांनी संशयावरून एका कारला थांबवले. त्यात हे तिघे होते. तसेच, कारच्या झडतीमध्ये 9 एमएम पिस्तूल, 11 काडतुसे, एक विदेशी हातबॉम्ब आणि स्फोटकं जप्त करण्यात आले. चौकशीदरम्यान दहशतवाद्यांनी मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचं उघड केलं आहे.
काही दिवसांपूर्वीच सहा दहशतवाद्यांना पकडलंकाही दिवसांपूर्वी सुरक्षा यंत्रणांनी 2 पाकिस्तानी नागरिकांसह 6 जणांना अटक केली. या दहशतवाद्यांना पाकिस्ताननं दहशतवादी कारवाया करण्यासाठी प्रशिक्षण दिलं आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं दिली होती. या प्रकरणी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये छापे टाकण्यात आले. यामधून सहा जण सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटकं आणि हत्यारं जप्त करण्यात आली. पाकिस्तानमधून मिळणाऱ्या आदेशांवर त्यांचं काम सुरू होतं.