शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

Pushpak Express robbery and rape case; आणखी चार दराेडेखाेर गजाआड, दाेघे स्वत:हून हजर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 7:24 AM

Pushpak Express robbery and rape case; लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसमध्ये शुक्रवारी इगतपुरी ते कसारादरम्यान दरोडा घालून एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून आणखी चार आराेपींना कल्याण लाेहमार्ग पाेलिसांनी अटक केली आहे़

कसारा : लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसमध्ये शुक्रवारी इगतपुरी ते कसारादरम्यान दरोडा घालून एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून आणखी चार आराेपींना कल्याण लाेहमार्ग पाेलिसांनी अटक केली आहे़ पळून गेलेल्या आराेपींपैकी दाेघे शनिवारी रात्री कल्याण लाेहमार्ग पाेलीस ठाण्यात स्वत:हून हजर झाले, तर दाेघांना इगतपुरी पाेलिसांनी रात्रभर शाेधमाेहीम राबवून अटक केली. त्यांना रविवारी सकाळी कल्याण लाेहमार्ग पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले.एक्स्प्रेसमध्ये धुडगूस घालून पळून जाताना चार दराेडेखाेरांना प्रवाशांनीच पकडून पाेलिसांच्या ताब्यात दिले हाेते. या घटनेत प्रतिकार करणारे काही प्रवासी जखमी झाले हाेते. त्यांच्यावर उपचार करून त्यांना कल्याण लाेहमार्ग पाेलीस ठाण्यात जबाब नाेंदवण्यासाठी पाठवले. त्यांनी दिलेल्या तक्रारींनुसार आठ आराेपींवर कल्याण लाेहमार्ग पाेलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल झाले आहेत. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी वसंत पथवे, सचिन शिंदे, पोलीस कर्मचारी रुद्रे, महिरे, पिठुले  यांनी रात्रभर शोधमोहीम राबवून मुख्य आरोपी राहुल आडोळे ऊर्फ राहुल्या (रा. टाके) आणि काशिनाथ तेलंग (रा. घोटी) यांना अटक केली. या घटनेतील सर्व आठ आराेपींना अटक झाली आहे. अर्शद खान, प्रकाश पारधी, किशोर सोनावणे, आकाश शेणारे, धनंजय भगत ऊर्फ गुड्डू अशी इतर अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. एकाचे नाव समजू शकलेले नाही. याप्रकरणी आरोपींवर लूटमार, बलात्कार, महिलांची छेड आणि बेकायदा प्रवास अशा विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले असल्याचे कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी वाल्मीक शार्दूल यांनी सांगितले. पुढील तपास कल्याण लाेहमार्ग पाेलीस उपायुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शार्दूल करीत आहेत. दरम्यान, आरोपी हे इगतपुरी ते कसारा-कल्याण दररोज वेगवेगळ्या गाड्यांतून फेरीवाले बनून प्रवास करीत असल्याचे इगतपुरी रेल्वे स्थानकातील काही प्रत्यक्षदर्शींकडून समजते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी