कोलकाता विमानतळावर सीआयडीच्या पथकाला मोठं यश आलं आहे. सीआयडीनं तब्बल ४,२५० कोटी रुपये किमतीचा दुर्मीळ किरणोस्तारी पदार्थ (रेडिओ अॅक्टीव्ह मेटल) जप्त केला आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयच्या विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये शैलेन कर्माकर (४१) आणि असित घोष (४९) यांचा समावेश आहे. शैलेर कर्माकर हा लेफ्टिनंट विश्वनाथ कर्माकर यांचा मुलगा असून हुगळीचा रहिवासी आहे. तर असित घोष देखील हुगळीचा असल्याची माहिती समोर आली आहे. (Radio active metal worth Rs 4250 crore seized by CID at Kolkata airport, 2 arrested)
सीआयडीला आरोपींकडून करड्या रंगाचे चार दगडी तुकडे जप्त करण्यात आले. यांचं वजन २५० ग्रॅम इतकं असून ते दगड अंधारात चमकत असल्याचं लक्षात आलं. हे दगड किरणोत्सारी असल्याचं निष्पन्न झालं. प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार जप्त करण्यात आलेला पदार्थ कॅलिफोर्नियम असल्याची शक्यता आहे. जो एक किरणोत्सारी पदार्थ असून भारतीय चलनानुसार कॅलिफोर्नियमची किंमत प्रति ग्रॅम तब्बल १७ कोटी रुपये इतकी आहे.
काय आहे कॅलिफोर्नियम?देशातील सामान्य व्यक्तीला किरणोत्सारी पदार्थ बाळगण्याची किंवा खरेदी करण्याची परवानगी नाही. या पदार्थांची विक्री केवळ परवाना असलेल्यांनाच करता येते. मुंबईत भाभा अणू संशोधन केंद्रातच कॅलिफोर्नियम मिळतं. कॅलिफोर्नियम हा एका साबणाच्या वडीसारखा असतो. त्याचे ब्लेडनं तुकडे करता येतात. हा पदार्थ इतका दुर्मीळ का आहे याचा अंदाज यावरुनच लावता येईल की याचं उत्पादन दरवर्षी केवळ अर्धाग्रॅम इतकं होतं. त्यामुळेच याच्या एका ग्रॅमची किंमत तब्बल १७ कोटींपेक्षाही अधिक आहे.