राहुल द्रविडचा 19 वर्षांखालील संघातील सहकाऱ्याची आत्महत्या
By पूनम अपराज | Published: October 10, 2020 04:50 PM2020-10-10T16:50:25+5:302020-10-10T16:52:24+5:30
Suicide : सुरेश कुमार यांनी 1990 साली अंडर-19च्या टीममधून केरळचे प्रतिनिधीत्व केलं होतं. केरळमधून अंडर-19च्या टीममध्ये खेळणारा तो पहिला खेळाडू ठरला होता.
राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी करणारा क्रिकेटपटू एम. सुरेश कुमार (४७) यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे. सुरेश कुमार यांनी 1990 साली अंडर-19च्या टीममधून केरळचे प्रतिनिधीत्व केलं होतं. केरळमधून अंडर-19च्या टीममध्ये खेळणारा तो पहिला खेळाडू ठरला होता.
सुरेश कुमारने काल रात्री राहत्या घरात बेडरूममध्ये आत्महत्या केली. आज सकाळी ७.१५ वाजताच्या सुमारास त्यांचा मृतदेह घरात आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यामुळे पोलिसांना तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनीही पंचनामा केला असून अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश यांचा मृतदेह त्यांच्या मुलाने पहिला
स्पिनर सुरेश कुमारने 1990 मध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यातून पदार्पण केलं होतं. त्यावेळी राहुल द्रविड अंडर-19च्या संघाचा कर्णधार पद भूषवलं होतं. त्यावेळी सुरेश कुमार आताचे आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्जचे कोच आणि न्यूझीलंड संघाचे माजी कर्णधार स्टिफन फ्लेमिंग आणि जलदगती गोलंदाज डियोन नॅशच्या विरोधात मैदानात उतरला होता. केरळने 1994-94मध्ये रणजी करंडक जिंकला होता. तामिळनाडू विरुद्ध झालेल्या या सामन्यातील विजयात सुरेश कुमारचा मोलाचा वाटा होता. रणजी करंडकमध्ये सुरेशने 164 धावा देऊन 12 बळी घेतले होते. त्यानंतर 1995-96 मध्येही रणजी करंडकमध्ये राजस्थानविरुद्धच्या सामन्यात सुरेश यांनी हॅट्रिक केली होती.
सुरेश यांनी झारखंडविरुद्धचा रणजी सामना खेळल्यानंतर 2005 साली क्रिकेट क्षेत्रातून संन्यास घेतला होता. त्यानंतर रेल्वेसोबत काम करू लागले. सुरेश यांनी त्यांच्या करिअरमध्ये 72 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी 196 बळी घेतले होते. दरम्यान, त्यांनी 51 लिस्ट ए सामन्यातही सहभाग घेतला होता. त्याच्या कारकिर्दीत त्याने अनेक बड्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवत विकेट घेतली होती.
An under-appreciated Kerala cricketer w/a formidable record, M. Suresh Kumar, passed away yesterday at the age of 47. https://t.co/ZNOgtuUkim
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) October 10, 2020
In just 72 matches, he had 12 five-wicket hauls&two 10-wkts. He was a useful lower-order batsman w/a 1st-class century&7 fifties. OmShanti