राज्यात ईडीकडून एकाच वेळी अनेक ठिकाणी धाडसत्र सुरू आहेत. नागपूरमध्ये नागपुरात RTO अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या घरीसुद्धा ईडीची धाड टाकली आहे. मंत्री अनिल परब यांच्या प्रकरणात ही धाड टाकली आहे. बजरंग खरमाटे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे.
शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यासी संबंधित काही मालमत्तांवर ईडीने कारवाई केल्याचे वृत्त ताजे असतानाच आता शिवसेना नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित काही मालमत्तांवर ईडीने छापे टाकले आहेत. अनिल देशमुख यांच्यावर आरोप झालेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणासंदर्भात हे छापे टाकण्यात आल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
महाराष्ट्र सरकारमधील मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित असलेल्या तीन मालमत्तांवर छापे टाकण्यात आल्याची माहिती ईडीने दिली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप झालेल्या मनी लाँड्रिग प्रकरणाशी असलेल्या संबंधांवरून महाराष्ट्र सरकारमधील मंत्री अनिल परब यांच्या तीन मालमत्तांवर कारवाई करण्यात आल्याचे ईडीने सांगितले. दरम्यान, काल अनिल परब यांना ईडीने नोटिस पाठवल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. तसेच या नोटिशीवरून शिवसेनेने केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती.