बारामती : शहर परिसरात पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात बेकायदा गुटखाविक्री करणाऱ्या बड्या होलसेल विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये साडेबारा लाखाच्या बेकायदेशीर गुटख्यासह १६ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती शहर व तालुका पोलीस स्टेशन हद्दीत कसबा, पेन्सिल चौक येथे बेकायदा गुटखा विक्री य होत असल्या बाबत गोपनीय माहीती पोलीसांना मिळाली होती.यावरुन पोलीसांनी विविध ठीकाणी छापे टाकले.यामध्ये १२ लाख २४ हजार ४०० रुपये किंमतीचा आरएमडी,गोवा,विमल गुटखा,तसेच ३ लाख रुपये किंमतीचा छोटा टेम्पो जप्त करण्यात आला आहे.पोलीसांनी जप्त केलेला माल अन्न आणि औषध प्रशासनाच्या ताब्यात दिला आहे.याप्रकरणी पोलीसांनी आरोपी प्रशांत धनपाल गांधी (रा.लासुर्णे ,ता. इंदापूर), विरेंद्र चंद्रकांत काळे(रा.लासुर्णे,ता.इंदापुर), अशविनी कुमार (रा. उत्तर प्रदेश),सुरज रमेश साळुंखे(कसबा, बारामती),विजय संपत लगड(कारभारी नगर, बारामती),संतोष लॅक्समन गायकवाड(वसंतनगर बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक संदिप पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक जयंत मीना यांचे मार्गदर्शना खाली बारामती क्राईम ब्रँच पथकाचे पोलीस हवालदार संदिप जाधव, सुरेंद्र वाघ,पोलीस नाईक स्वप्नील अहिवळे,पोलीस कॉन्स्टेबल दशरथ कोळेकर,पोलीस कॉन्स्टेबल विशाल जावळे, शर्मा पवार ,पथक प्रमुख पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,तसेच,बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, पोलीस उपनिरीक्षक सतीश अस्वर, बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धन्याकुमार गोडसे, पोलीस उपनिरीक्षक सचिन पत्रे यांनी कारवाई केली.बारामतीमध्ये आज गुटखा विक्रेत्यांवर झालेली कारवाई म्हणजे हिमनगाचे टोक मानले जात आहे.गूटखाविक्रीची कोटींची उलाढाल होत असल्याची चर्चा आहे.
मागील वर्षी तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या पथकाने या ठिकाणी येवुन गुटखाविक्रीवर कारवाई केली होती.————————————