मुंबई : मुंबईत ‘कोल्ड प्ले’ या आंतरराष्ट्रीय बँडच्या नियोजित कार्यक्रमाच्या तिकिटांमध्ये काळाबाजार, तसेच बनावट तिकीटविक्री झाल्याच्या प्रकरणाचा तपास ईडीने सुरू केला आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी मुंबई, दिल्ली, जयपूर, चंदिगड आणि बंगळुरू येथे एकूण १३ ठिकाणी छापेमारी केली. अधिकाऱ्यांनी मोबाइल फोन्स, सिम कार्ड, लॅपटॉप आदी इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत.
कोल्ड प्ले आणि दिलजीत दोसांझ या दोघांच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर या तिकिटांची ऑनलाइन विक्री करणाऱ्या दोन कंपन्यांची तिकिटे एका मिनिटाच्या आत विकली गेली. त्यानंतर तिकिटांत मोठ्या प्रमाणावर काळाबाजार झाल्याचे उघड झाले.