शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
2
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
3
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
4
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
5
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
6
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
7
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
8
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
9
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
10
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
11
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
12
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
13
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
14
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
15
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
16
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
17
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
18
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
19
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
20
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...

प्रसिद्ध शायर मुन्नवर राणा यांच्या घरावर छापेमारी; ५० हून अधिक पोलिसांचे पथक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2021 4:54 PM

Raid on munawwar Rana's house : रायबरेली पोलिसांनी लखनऊ पोलिसांच्या मदतीने मुन्नवर राणा यांच्या घरावर छापा टाकला.

ठळक मुद्देराणा यांची मुलगी सुमैया हिने पोलिसांच्या या छापेमारीबाबत असंतोष व्यक्त केला आहे. 

काल रात्री रायबरेली पोलिसांनी प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात मुनावर राणा यांच्या मुलीने पोलिसांवर अत्याचार केल्याचा आरोप केला. रायबरेली पोलिसांनी लखनऊ पोलिसांच्या मदतीने मुन्नवर राणा यांच्या घरावर छापा टाकला. राणा यांची मुलगी सुमैया हिने पोलिसांच्या या छापेमारीबाबत असंतोष व्यक्त केला आहे. प्रसिद्ध कवी मुनव्वर राणा यांचा मुलगा तबरेज राणा यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी रायबरेली पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. पोलिस तपासणीनुसार, राणा यांच्या मुलाने काका आणि चुलतभावांना गोवण्यासाठी स्वत: वर गोळी झाडून घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या संपूर्ण प्रकरणाच्या मागे मालमत्तेचा वाद सांगितला जात आहे. आतापर्यंत पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. दुसरीकडे, टीव्ही ९शी बोलताना मुनव्वर राणा म्हणाले की, पोलिसांच्या तपासाला मला हरकत नाही, त्यांनी येऊन चौकशी करावी. पण मला दहशतवाद्यासारखे वागवले जाऊ नये. पोलिसांनी तबेरेजला नोकरीवरून काढून टाकले की नाही याचा तपास केला पाहिजे, परंतु मध्यरात्री माझ्या घरी सर्च वॉरंटशिवाय गुंडांसारखे वागणे, महिला व मुलांचे फोन हिसकावणे आणि गैर कृत्य करणे पूर्णपणे चुकीचे आहे. माझ्यावर आरोप करणारे रायबरेलीचे लोक माझ्या तुकड्यावर वाढत असत.२९ जून रोजी, उत्तर प्रदेशच्या रायबरेली जिल्ह्यातील सदर कोतवाली परिसराच्या त्रिपुला चौकात, दुचाकीस्वारांनी प्रख्यात शायर मुन्नवर राणा यांचा मुलगा तबरेज राणा यांच्या कारवर हल्ला केला आणि गोळ्या झाडल्या. वास्तविक, त्रिपुलाच्या पेट्रोल पंपावर दुचाकीस्वारांनी दोन राउंड झाडल्या. दोन्ही गोळ्या तबरेज राणा यांच्या कारला लागली होती. मात्र, गोळीबारानंतर दोन्ही आरोपी पळून गेले.सुप्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यूपीमधील रायबरेलीचे असून गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या कुटुंबासमवेत लखनऊमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांचा मुलगा तबरेज राणा देखील लखनऊमध्ये त्याच्याबरोबर राहतो. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी तबरेज कारने लखनऊला जात होता. जाताना पेट्रोल पंप पाहून तो गाडीत पेट्रोल भरण्यासाठी गाडीतून बाहेर आला होता.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसraidधाडFiringगोळीबार