राजकुमार जोंधळे / लातूर
किल्लारी (जि. लातूर) : औसा तालुक्यातील गुबाळ, किल्लारी येथे सुरु असलेल्या मटक्यावर पोलिसांनी एकाच दिवशी छापा मारला असुन, रोख रक्कम आणि मटक्याचे साहित्य जप्त केले आहे. याबाबत किल्लारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, औसा तालुक्यातील गुबाळ आणि किल्लारी गावात मटका सुरु असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अशोक ढोणे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे गुबाळ चौकानजीक एका झाडाखाली समद शेख हा मटकाबुकी चालवणारा निजाम शेख याच्या सांगण्यावरुन मटका, जुगार चालवित होता. दरम्यान, पोलिसांनी छापा मारुन, त्याच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम जप्त केली आहे. तर किल्लारी येथे पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह राजपूत यांनी ज्योतीबानगर येथे पत्र्याच्या रोडमध्ये तिर्रट नावाचा जुगार सुरु होता. यावेळी पोलिसांनी छापा मारुन बालाजी राम गावकरे, उत्तम तुकाराम जाधव, निळकंठ गोवींद भोसले यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शिवाय, किल्लारी पाटी परिसरात सुरु असलेल्या मटका जुगारावर छापा मारण्यात आला. यावेळी अशोक ज्ञानदेव क्षीरसागर यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोकड असा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत दोघांवर करवाई करण्यात आली आहे.