बारामती : रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीत बारामती क्राईम ब्रँच पथकाने छापा टाकला. यावेळी पोलिसांनी अवैध दारुविक्रीसह ऑनलाईन बिंगो अड्डयावर छापा टाकला.यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये सुमारे ६ लाख ६६ हजार ६१४ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणावर अवैध दारुसाठा बाळगून त्याची विक्री सुरु आहे. तसेच बिंगो (ऑनलाईन मटका) चालवून खेळत आहेत.याबाबत अप्पर पोलीस अधिक्षक जयंत मीना,उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांना माहिती मिळाली.या माहितीवरून पोलिसांनी नियोजन करून एकाचवेळी ५ ठिकाणी छापा मारला.यावेळी केलेल्या कारवाईमध्ये १ लाख २५ हजार ३८० रोख, २ लाख २२ हजार रुपये किंमतीचे मोबाईल, ४ कॉम्प्युटर संच, एलसीडी स्क्रीन, 2 सीसीटीव्ही डीव्हीआर टेबल,खुर्च्या आदी सहित्य टेबल, खुर्च्या व इतर साहित्यासह ३ लाख ४७ हजार ३८० चा माल जप्त करण्यात आला.हॉटेल संदीप आणि एसवन येथे २८ हजार ५७० रोख, २ लाख ९० हजार रुपये किंमतीची आयबी-नंबर १,आरसी,रॉयल स्टग,रम, बियर,टँगोसह ३२ देशी विदेशी दारु बॉक्ससह ३ लाख १९ हजार २४३ चा माल मिळाला आहे. पोलीसांनी २१ आरोपींना ताब्यात घेतले आहे.रांजणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकुण रोख रकमेसह ६ लाख ६६ हजार ६१४ चा माल जप्त केला आहे.पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे,बारामती क्राईम ब्रँच पथकाचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,पोलीस हवालदार संदिप जाधव, सुरेंद्र वाघ,राजेंद्र जाधव,भानुदास बंडगर,पोलीस नाईक स्वप्नील अहिवळे,पोलीस कॉन्स्टेबल दशरथ कोळेकर, विशाल जावळे, शर्मा पवार, पोलीस निरीक्षक मनोज यादव,सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल कदम,शुभांगी कुटे,पोलीस नाईक मंगेश चिथळे,प्रफुल भगत,अजय भुजबळ ,रांजणगाव पोलीस ठाण्याच्या वतीने हि कारवाई केली.
बारामती क्राईम ब्रँचचा अवैध दारुविक्रीसह ऑनलाईन बिंगो अड्डयावर छापा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2019 4:19 PM
पोलिसांनी नियोजन करून एकाच वेळी ५ ठिकाणी छापा मारला.
ठळक मुद्दे६ लाख ६६ हजार ६१४ रुपयांचा माल जप्त