शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

T20 World Cup 2021 Ind vs Pak : १९ ठिकाणी छापेमारी, डझनभर बुकी ताब्यात; पहिल्याच सामन्यात क्रिकेट सट्ट्याचा डाव उधळला!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 12:41 AM

आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यावर नागपुरातून कोट्यवधींचा सट्टा लावला-घेतला जातो. नागपुरातील बुकी गोवा अन् थेट दुबईत कटिंग (उतारी) करतात. अनेक जण स्वत:कडेच लगवाडी ठेवून कोट्यवधींची हेरफेर करतात.

नागपूर- क्रिकेट सट्ट्याच्या माध्यमाने कोट्यवधींची उलाढाल करणाऱ्या शहरातील बुकींवर छापेमारी करण्यात आली आहे. तब्बल १९ ठिकाणी पोलिसांनी ही छापेमारी केली. टी-२० च्या पहिल्या सामन्यात बेटिंगची तयारी करून बसले असतानाच पोलिसांनी बुकींना ताब्यात घेतले. यामुळे संपूर्ण डावच उधळला गेल्याने अनेकांनी नागपूरबाहेर धाव घेत स्वत:ला सेफ करून घेतले. (Cricket betting ruined in the first match)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यावर नागपुरातून कोट्यवधींचा सट्टा लावला-घेतला जातो. नागपुरातील बुकी गोवा अन् थेट दुबईत कटिंग (उतारी) करतात. अनेक जण स्वत:कडेच लगवाडी ठेवून कोट्यवधींची हेरफेर करतात. शहरातील भ्रष्ट पोलिसांकडून कारवाईपूर्वीच टीप मिळत असल्याने बुकींचे फावते. ते पकडले जात नाही. ही बाब ध्यानात घेऊन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी टी-२०ची फटकेबाजी सुरू होण्यापूर्वीच नागपुरातील बुकींचा डाव उधळण्याची व्यूहरचना तयार केली होती. गुन्हे शाखेचे नवनियुक्त पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांना ही जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानुसार, कारवाईसाठी १० पथके तयार करण्यात आली. भारत-पाकिस्तानचा सामना सुरू होण्याला काही वेळ शिल्लक असताना शहरातील जरीपटका, खामला, वर्धमाननगर, महाल तसेच विविध भागातील १९ ठिकाणी पोलिसांनी छापे मारले. रात्री ८ वाजेपर्यंत डझनभर बुकींना ताब्यात घेतले. त्यांच्यातील अनेकांचे गोवा आणि इतर राज्यातील बुकींशी कनेक्शन असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्याकडून बड्या बुकींबाबतची माहिती घेतली जात आहे.

सहा बुकी ताब्यात,अनेकांचे पलायन -फिरोज रफिक शेख (वय ४९, रा. शुक्रवार तलावाजवळ, गणेशपेठ), पीयूष अग्रवाल (वय ३६, रा. लकडगंज), अशोक उर्फ गुप्ता उर्फ तुलसीराम गुप्ता, राहुल रमेश अग्रवाल (वय ४६, रा. बजेरिया, गणेशपेठ), प्रवीणकुमार उर्फ चिंटू चाैरसिया (वय ३२, रा. गड्डीगोदाम) आणि सोनू चहांदे (वय ४५, रा. गड्डीगोदाम), अशी ताब्यात घेतलेल्या बुकींची नावे आहेत. दोन डझनपेक्षा अधिक बुकी शहर सोडून पळून गेले. त्यांनी रायपूर, पांढुरण्याकडे धाव घेतल्याचे उघड झाले आहे.                                                                                         

बुकींचा सरदार ग्रामीणमध्ये -मध्यभारतातील बुकी बाजाराचा म्होरक्या अन् नागपुरातील सर्वात मोठा बुकी समजला जाणारा यावेळी अलेक्झांडरने नागपूर ग्रामीणमध्ये आपले राज्य सुरू केले आहे. त्याने यापूर्वी स्वत:सह अनेकांचे अड्डे थाटून आयपीएलच्या सीझनमध्ये हजारो कोटींची खयवाडी केली. पोलीस त्याच्या मुसक्या कधी बांधतात, त्याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरCricket Bettingक्रिकेट सट्टेबाजीIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान