अलिबाग : रायगड पोलीस भरती मध्ये बोगस प्रमाणपत्र सादर करणाऱ्या चार जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अजून बीड जिल्ह्यातील चार जणाविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे या गुन्ह्याची व्याप्ती अजून वाढण्याची शक्यता आहे. गुन्हा दाखल झालेल्या चार जणांना अद्याप अटक झालेली नाही आहे.
राज्यात पोलीस भरती शासनाने जाहीर केली होती. रायगड पोलीस दलात २७२ पोलीस शिपाई आणि सहा चालक पदासाठी डिसेंबर महिन्यात भरती प्रक्रिया सुरू झाली होती. यासाठी हजारो उमेदवारांनी भरती प्रक्रियेत सहभाग घेतला होता. पुरभा बालाजी गायकवाड (रा. लहुळ, ता. माजल गाव, जिल्हा बीड), ज्ञानेश्वर श्रीधर भस्मारे (रा. खोकर मोह, ता. शिरूर कासार जिल्हा बीड), संदीप प्रकाश खरपाडे, (रा. वाढवणा, ता. बीड, जिल्हा बीड), वैभव संदीप खेडकर, (रा. पिंपळनेर, ता. शिरूर कासार, जिल्हा बीड) हे चौघेही प्रकल्पग्रस्त म्हणून भरतीला उतरले होते.
मैदानी चाचणी, लेखी परीक्षेत चौघेही उत्तीर्ण होऊन पात्र यादीत त्याची नावे आली होती. पोलीस प्रशासनाने चौघा उमेदवाराची कागदपत्र, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मागवून त्याची तपासणी त्याच्या गावात जाऊन केली. यावेळी चौघेही प्रकल्पग्रस्त नसल्याचे उघडकीस आले. चौघा उमेदवारांनी बोगस प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र दिल्याचे समोर आले. त्यानुसार अलिबाग पोलीस ठाण्यात चौघाविरोधात भा द वी कलम ४२०, ४६७, ४६८,४७१ अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी याना अटक केलेली नाही आहे. तर पुढील तपास पोसई ओ बी कावळे आणि पोसई अभिजित पाटील करीत आहेत.