बॉलिवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा (Raj Kundra) अश्लिल चित्रपटांच्या निर्मिती प्रकरणी मुंबईपोलिसांच्या क्राईम ब्रान्चच्या (Crime Branch) ताब्यात आहे. या संपूर्ण पॉर्न रॅकेट प्रकरणी गुरुवारी अनेक आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या. आजतकनं सूत्रांच्या हावाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार राज कुंद्रानं दीड वर्षांमध्ये १०० पेक्षा अधिक पॉर्न मुव्हीजची निर्मिती केली होती. तसंच याच्या माध्यमातून त्यानं कोट्यवधी रूपयांचीही कमाई केली होती.
समोर आलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रान्चन अंधेरी पश्चिम येथील राज कुंद्राच्या वियान (Viaan) या ऑफिसवर छापा टाकला होता. या ठिकाणी पोलिसांना मोठ्या प्रमाणात डेटा हाती लागला. इतकंच नाही तर काही डेटा डिलीटही करण्यात आला होता. हा डेटा क्राईम ब्रान्च फॉरेन्सिक एक्स्पर्ट्सच्या मदतीनं रिकव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनुसार अश्लिल चित्रपटांच्या निर्मितीमध्ये राज कुंद्रा ऑगस्ट २०१९ पासून सहभागी होता, तसंच त्यानं आतापर्यंत १०० पेक्षा अधिक पॉर्न फिल्म्सची निर्मिती केली आहे. क्राईम ब्रान्चशी निगडीत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटांच्या माध्यमातून राज कुंद्रानं कोट्यवधींची कमाई केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे चित्रपट ज्या अॅपवर अपलोड केले जातात त्यांच्याकडे २० लाखांच्या जवळ सबस्क्रायबर्स आहेत. दरम्यान, वेबसाईट पेक्षा अॅपचा वापर करणं सोपं असल्यानं अॅप तयार करण्यात आल्याचं क्राईम ब्रान्चचं म्हणणं आहे. याशिवाय वेब साईट बंदही करण्यात येते, परंतु अॅपबाबत तसं होत नाही.
तपासात सहकार्य नाहीदरम्यान, असे आरोप लावण्यात आल्यानंतरही राज कुंद्रा तपासात सहकार्य करत नसल्याचं सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज कुंद्रा तपासात सहकार्य करत नाही. तसंच बऱ्याच प्रश्नांची तो उत्तरंही देत नाही आणि आपल्यावरील आरोपही फेटाळत आहे. आपण कोणतीही पॉर्न मुव्ही तयार केली नसल्याचं राज कुंद्राचं म्हणणं आहे. परंतु क्राईम ब्रान्चच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे राज कुंद्राविरोधात अनेक पुरावे आहेत.