मुंबई - पोर्नोग्राफी प्रकरणात अटकेत असलेल्या शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राची कोर्टाने २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी वाढवली आहे. त्यामुळे कुंद्राची मुंबई पोलिसांकडून अधिक चौकशी केली जाणार आहे. राज कुंद्रा आणि रायन थार्पचा लँपटाँप पोलिसांनी जप्त केला आहे.
राजच्या लॅपटॉपमध्ये सॅमबॉक्स नावाच्या फोल्डरमध्ये 48 जीबीचा डेटा जप्त केला आहे. जप्त केलेल्या डेटामध्ये हॉटशॉटचे 51 व्हिडिओ, एका Whats Appमध्ये राज यांच्याकडे काम करणाऱ्या महिलेला पुन्हा कामावर घेण्याबाबत उमेश कामत याची विनंती आहे.तसेच कंपनीतील अकाऊटंट महिला दिवसाचा नफाआणि खर्च याची माहिती राज आणि इतर सहकाऱ्यांना विशलेषन करून सांगायची. ४ ते १० पाऊडचा कलाकार आणि व्हिडिओ बनवण्यासाठी खर्च केला जात असल्याचा अंदाज असून सह कलाकारांचे जबाब नोंदवले असून ज्या मुलीची किंवा इतर अन्य व्यक्तींची फसवणूक यांनी केली आहे. त्यांना समोर येऊन जबाब नोंदवण्याचे आवाहन पोलिसांनी केलं आहे.
हॉटशॉट हे ऍप डेव्हलप करणाऱ्या साक्षीदाराने हे ऍप अश्लील असल्याची माहिती दिली आहे. फेब्रुवारी महिन्यात पोलिसांनी कारवाई केल्यानंतर थॉर्पने मोठ्या प्रमाणात डेटा नष्ठ केला. एका मोबाईलमधील चॅटमध्ये राज कुंद्रा हा केमरिन जी लंडनची कंपनी हे व्हिडिओ अपलोड करत होती.या कंपनीचा राज हा भागीदार असल्याचे मेसेज मिळाले आहेत. यूट्यूबने या ऍपवरून डाऊन लोड केलेले व्हिडिओ नष्ट करून हे ऍपही यूट्यूबवर बंद केल्याची नोटिस दिली होती. ती पोलिसांच्या हाती लागली आहे.