राज ठाकरेंची सीआयडी चौकशी करा; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 07:10 PM2019-04-30T19:10:08+5:302019-04-30T19:10:34+5:30
सध्या हायकोर्टाने याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.
मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात हायकोर्टात याचिका करण्यात आली असून याचिकेत सीआयडी चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन ही याचिका करण्यात आली आहे. माजी पत्रकार एस. बालाकृष्णन यांनी हायकोर्टात ही याचिका दाखल केली आहे. मात्र, हायकोर्टाने याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.
पुलवामा हल्ल्याबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल राज ठाकरेंविरोधात गुन्हा नोंदवून सीआयडी चौकशी करा अशी मागणी एस बालाकृष्णन यांनी याचिकेत केली आहे. राज ठाकरेंनी देशावर मोठा दहशतवादी हल्ला होऊन युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण होईल असं भाकीत केलं होतं. यानंतरच पुलवामा दहशतवादी हल्ला झाल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. मात्र सध्या हायकोर्टाने याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.
मुंबई - राज ठाकरेंची सीआयडी चौकशी करा अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल https://t.co/fUWIufX59Y
— Lokmat (@MiLOKMAT) April 30, 2019