शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

स्विमिंग पूलमध्ये महिला कॉन्स्टेबलसोबत अश्लील चाळे करणाऱ्या DSP ला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 11:07 AM

स्विमिंग पूलमध्ये महिला कॉन्स्टेबलसोबत अश्लील चाळे करणाऱ्या राजस्थानच्या डीएसपीला उदयपूरमधील एका रिसॉर्टमधून अटक करण्यात आली आहे.

स्विमिंग पूलमध्ये महिला कॉन्स्टेबलसोबत अश्लील चाळे करणाऱ्या राजस्थानच्या डीएसपीला उदयपूरमधील एका रिसॉर्टमधून अटक करण्यात आली आहे. राजस्थानच्या स्पेशल ऑपरेशन ग्रूपनं रिसॉर्टवर छापा टाकला. डीएसपी आणि महिला कॉन्स्टेबल एका रिसॉर्टमधील स्विमिंग पूलमध्ये अश्लील चाळे करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. या व्हिडिओतील रिसॉर्टची माहिती घेत पोलिसांनी संबंधित रिसॉर्टवर छापा टाकून थेट डीपीसींना अटक करण्याची कारवाई केली आहे. 

महिला कॉन्स्टेबलसोबत लहान मुलगा देखील होता. त्यामुळे संबंधित महिला कॉन्स्टेबलला अटक करण्यात आलेली नाही. अश्लील व्हिडिओ सोशल मीडियात लीक झाल्यानंतर पोलीस प्रशासनात खळबळ उडाली होती. गुरुवारी रात्री उशिरा रिसॉर्टवर छापा टाकून उदयपूर येथून डीएसपी हीरालाल यांना अटक करण्यात आली आहे. 

डीएसपीचा महिला कॉन्स्टेबलसोबतचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित महिला कॉन्स्टेबलचा पती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचला होता. पण डीएसपीच्या दबावामुळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिला गेल्याचा आरोप पतीनं केला आहे. त्यानंतर संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनाही निलंबीत करण्यात आलं आहे. तर व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या डीसीपींवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

स्पेशल ऑपरेशन ग्रूपचे एडीजी अशोक राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली जात असून व्हिडिओ शूट कुणी केला आणि कुणी व्हायरल केला याचाही शोध घेतला जात आहे. व्हिडिओमध्ये लहान मुल देखील दिसत असल्यानं राज्य बाल संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा संगीता बेनिवाल यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. नागौर पोलीस अधिक्षकांना या प्रकरणाचा तीन दिवसांत अहवाल देण्याचा आदेश संगीता बेनिवाल यांनी दिला आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसSocial Viralसोशल व्हायरलRajasthanराजस्थान