टोंक-
टोंगच्या टोडारायसिंहच्या लांबाहरिसिंह मुंडियाकला परिसरात एक प्रेमी युगुल लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये राहात होतं. मुलीच्या घरच्यांनी याला विरोध केला आणि पंचायत बोलवण्यात आली. निकाल दिल्यानंतर पंचायतचे सदस्य निघून गेले आणि त्यानंतर मुलाला जी शिक्षा दिली ती पाहून सर्वच हादरले आहेत. मुलीच्या नातेवाईकांनी मुलीच्या बहिणीवरही अत्याचार केले.
डीएसपी मालपुरा सुशील मान यांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास १२ दिवसांपूर्वी मालपुरा ठाणे हद्दीतील मुलगी एका मुलासोबत पळून गेली होती. ती तरुणासोबत पत्नीसारखीच राहात होती. मुलीचे कुटुंबीय तिला दिवाळसणासाठी घेऊन जाण्यासाठी आले होते. दिवाळीनंतर मुलीच्या नातेवाईकांनी तिला परत जाऊ दिलं नाही. सोमवारी या प्रकरणाची भोपालाव मंदिराच्या बाहेरच मोग्या समाजाच्या पंचांसमोर पंचायत बसली आणि यात ती ज्या तरुणासोबत राहात होती त्यालाही बोलावण्यात आलं होतं.
तरुण आपल्या बहिणीसोबत पंचायतला हजर राहण्यासाठी पोहोचला होता. पंचायतीच्या पटेलांनी पाच दिवसांची मुदत देत ९३ हजार रुपये मुलीच्या वडिलांना द्यावेत त्यानंतरच मुलीला सोबत घेऊन जावे असे आदेश दिले. निकाल दिल्यानंतर पंचायतीचे अधिकारी आपापल्या घरी परतले.
रात्रभर दोघांना बांधून ठेवलंपंचायत संपल्यानंतर दोघंही भाऊ-बहिण आपल्या गावी जाण्यासाठी निघाले. बस स्टँडच्या दिशेनं जात असताना मुलीच्या नातेवाईकांनी दोघांना उचलून जंगलात नेलं. तिथं दोघांनाही रात्रभर एका झाडा बांधून ठेवलं.
पीडित तरुणानं दिलेल्या जबाबानुसार, मुलीच्या नातेवाईकांनी मला चपलेचा हार घातला आणि जबरदस्तीनं मूत्र प्यायला लावलं. डोक्यावर गरम चिमट्यानं चटके देण्यात आले. इतकंच नाही, तर धारधार शस्त्रानं माझं नाक कापण्याचा प्रयत्न केला. याचा व्हिडिओ रेकॉर्ड करुन सोशल मीडियात अपलोड करण्यात आला.
८ जणांविरोधात गुन्ह्याची नोंदपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीचे वडील नवरत्न, आई गीता, दोन भाऊ आणि मुलीच्या मेव्हण्यांसह एकूण ८ जणांविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे. तर तिघांना अटक करण्यात आली आहे.