राजस्थान येथील बांसवाडा येथून पोलिसांनी एक वेगळ्याच प्रकरणात आरोपींना ताब्यात घेतले. प्रकरण होते उंदीर चोरीचे, ही घटना राजस्थान येथील सज्जनगड पोलीस ठाणे परिसरातील आहे. उंदीर चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेले दोन आरोपी आंतरराज्य गाड्यांच्या चोरीशी संबंधीत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून ६ दुचाकी जप्त केल्या आहेत.
पण अजुनही उंदराचा शोध लागलेला नाही. चौकशीत आरोपींनी आतापर्यंत २० वाहन चोरीच्या घटनांची कबुली दिली. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करून कारागृहात रवानगी करण्यात आली. या टोळीचा मुख्य सूत्रधार मध्य प्रदेशातील आहे. राजस्थानमध्ये उंदीर चोरीची ही पहिलीच घटना असल्याचं सांगण्यात येत आहे.
अॅपल वॉचची कमाल! पतीने पत्नीला जिवंत पुरले, पण वॉचने वाचवला जीव, वाचा सविस्तर
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उंदीर चोरीच्या आरोपाखाली मोहित खिहुरी आणि अरविंद खिहुरी यांना अटक केली. यावेळी या आरोपींकडे उंदराच्या चोरीची माहिती घेत असताना दोघांनी गाडी चोरीचीही कबुली दिली. आतापर्यंच या दोघांनी कित्येक गाड्या चोरुन त्यांची विक्री केल्याचे समोर आले आहे.
उंदराची चोरी
बडखिया येथील रहिवासी असलेल्या मंगू नावाच्या व्यक्तीने आपल्या घरी पाळलेला काटेरी उंदीर चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. सुमारे ७०० ग्रॅम वजनाचा हा उंदीर चोरल्याचा आरोप त्यांनी आपल्या भावाच्या मुलावर केला होता. २८ सप्टेंबर रोजी रात्री २ वाजण्याच्या सुमारास ही चोरी झाल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत सांगितले होते. तो एक दुर्मिळ उंदीर होता. त्याची किंमत लाखो रुपये असल्याचे सांगितली . पोलिसांनी उंदराचा शोध सुरू केला आहे.
ही टोळी नियोजनबद्ध पद्धतीने काम करते. या टोळीचा मुख्य सूत्रधार मध्य प्रदेशातील असल्याचे समोर येत आहे. त्याचा शोध सुरू आहे. आरोपींना पकडल्यास वाहन चोरीच्या आणखी घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे. आणखी सहा चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत.