बलात्कारात राजस्थान टॉपवर तर उत्तर प्रदेश दुसऱ्या स्थानी; महाराष्ट्राचा कितवा नंबर ?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 12:46 PM2021-09-16T12:46:49+5:302021-09-16T12:47:28+5:30
केंद्र सरकारची एजन्सी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने बुधवारी 2020 ची आकडेवारी जारी केली.
नवी दिल्ली: देशात दररोज शेकडो बलात्काराच्या घटना घडत असतात. काही घटना पोलिसांत तक्रार दिल्यानंतर समोर येतात, तर काही समाज किंवा इतर कारणांमुळे दाबल्या जातात. दरम्यान, केंद्र सरकारच्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) ने बुधवारी 2020 ची आकडेवारी जारी केली. या आकडेवारीनुसार, देशात राजस्थानमध्ये सर्वाधिक बलात्काराच्या घटना घडतात. तर, दुसऱ्या नंबरवर उत्तर प्रदेश आहे.
https://t.co/jPIeJK2g2y
— Lokmat (@MiLOKMAT) September 16, 2021
काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये एका 6 मुलीची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली होती.#CrimeNews
NCRB ने दिलेल्या माहितीनुसार, 2020 मध्ये देशभरात महिलांविरोधातील 3,71,503 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. 2019 च्या तुलनेत हा आकडा कमी आहे. 2019 मध्ये 4,05,326 प्रकरणे नोंदवण्यात आली होती. दरम्यान, 2020 मध्ये देशभरात बलात्काराचे 28 हजार 46 गुन्हे नोंदवण्यात आले. म्हणजेच दररोज सरासरी 77 बलात्काराची प्रकरणे नोंदवली गेली.
2019 च्या तुलनेत बलात्काराच्या घटनांमध्ये घट झाली आहे, परंतु परिस्थिती बदललेली नाही. बलात्काराच्या प्रकरणांमध्ये राजस्थान गेल्या वर्षीही अव्वलस्थानी होता. 2019 मध्ये राजस्थानमध्ये सर्वाधिक 5 हजार 997 प्रकरणे नोंदवण्यात आली. तर, यूपी दुसऱ्या क्रमांकावर आणि मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर होता. एवढेच नाही तर एनसीआरबीची आकडेवारीनुसार, 2020 मध्ये नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यांपैकी 295 प्रकरणांमध्ये पीडितांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी होते.
या राज्यात सर्वाधिक बलात्कार
एनसीआरबीने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमध्ये सर्वाधिक 5,310 बलात्काराच्या घटना घडल्या. त्या पाठोपाठ उत्तर प्रदेश-2,769, मध्यप्रदेश-2,339,महाराष्ट्र-2,061 आण असाम-1,657 चा नंबर लागतो.