शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

राजस्थानमध्ये ACB ची मोठी कारवाई! 2 लाखांची लाच घेताना मुंबईच्या 4 पोलिसांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 10:49 AM

Rajasthan’s ACB arrests 4 Mumbai Cops : बोरिवली पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकासह चार पोलिसांना लाच मागितल्याप्रकरणी बुधवारी अटक करण्यात आली आहे.

जयपूर - राजस्थानच्या जयपूरमध्ये लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (ACB) मोठी कारवाई केली आहे. दोन लाखांची लाच घेताना मुंबईच्या 4 पोलिसांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये एका अधिकाऱ्यासह तीन कॉन्स्टेबल्सचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले चारही पोलीस हे बोरीवलीतील पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. एका प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्यासाठी हे चारही जण जयपूरला आले होते. त्याचवेळी त्यांना लाच घेताना अटक करण्यात आली आहे.  

बोरिवली पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकासह चार पोलिसांना लाच मागितल्याप्रकरणी बुधवारी अटक करण्यात आली आहे. राजस्थान लाचलुचपत प्रतिबंध विभागाने ही कारवाई केली असून त्यांनी दोन लाखांची मागणी केल्याचा आरोप आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रशांत शिंदे, कॉन्स्टेबल लक्ष्मण, सुभाष पांडुरंग आणि सचिन गुडके अशी या अटक करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत.

मुंबईत राहणारा कापड व्यापारी विनोद हा बोरिवलीत भाडे तत्वावर दुकान चालवतो. याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे आणि त्याचे पथक जयपूरला विनोदला अटक करण्यासाठी गेले. तेव्हा त्याच्या वडिलांनाही अटक करण्याचे त्यांनी धमकावले. तसेच त्यांच्याकडून दोन लाखांची मागणी केली असा आरोप आहे. त्यानुसार त्यांच्या घर मालकाने जयपूर लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दाखल केली. शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. त्यानंतर लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. 

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीसArrestअटकRajasthanराजस्थानAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग