धक्कादायक! कोर्टाने सुनावली होती जन्मठेपेची शिक्षा, कोर्टातूनच फरार झाला बलात्काराचा दोषी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 12:04 PM2021-03-06T12:04:40+5:302021-03-06T12:08:37+5:30
Life imprisonment accused absconding from court : ही घटना राजगढ जिल्हा कोर्ट परिसरातील आहे. इथे पॉस्को अॅक्टनुसार अल्पवयीनसोबत बलात्कार केल्याप्रकरणी कोर्टाने निर्णय देत दोषी जितेंद्र भील याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
मध्य प्रदेशच्या राजगढ जिल्हा कोर्टाने पॉक्सो अॅक्ट अंतर्गत बलात्काराच्या एका दोषीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. शिक्षा ऐकून दोषीच्या पायाखालजी जमीन सरकली. धक्कादायक बाब म्हणजे दोषी जितेंद्र भील शिक्षा ऐकताच न्यायालयातून फरार (Life imprisonment accused absconding from court) झाला. पोलिसांनी दोषीचा सगळीकडे शोध घेतला. पण तो काही पोलिसांच्या हाती लागला नाही.
ही घटना राजगढ जिल्हा कोर्ट परिसरातील आहे. इथे पॉस्को अॅक्टनुसार अल्पवयीनसोबत बलात्कार केल्याप्रकरणी कोर्टाने निर्णय देत दोषी जितेंद्र भील याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. शिक्षा ऐकताच कोर्टाच्या कर्मचाऱ्याला धक्का देत जितेंद्र फरार झाला. पोलिसांनी त्याचा शोध घेतला पण त्याचा काही पत्ता लागला नाही. (हे पण वाचा : शाळेतील अल्पवयीन मुलीचा विनयभंग; शिक्षकाला पाच वर्षांची शिक्षा)
असे सांगितले जात आहे की, दोन वर्षाआधी जितेंद्र भीलने मानसिक दिव्यांग मुलीवर बलात्कार केला होता. तेच जेव्हा अल्पवयीन गर्भवती झाली तेव्हा कुटुंबियांनी विचारल्यावर तिने या घटनेबाबत सांगितले. यानंतर २०१८ मध्ये अल्पवयीन पीडितेला घेऊन कुटुंबिय पोलिसांकडे गेले आणि आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी जितेंद्र भील याला अटक केली आणि कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यानंतर तो चक्क कोर्टातून फरार झाला. (हे पण वाचा : जामिनावर सुटलेल्या बलात्काऱ्याने पीडितेला जिवंत जाळले, आरोपीचे कुकृत्य CCTVमध्ये कैद झाले)
डीपीओ(सरकारी वकिल) आलोक श्रीवास्तव म्हणाले की २ ऑक्टोबर २०१८ ला पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने तक्रार दिली होती की, तिची मुलगी मनोरूग्ण आहे. आरोपी जितेंद्र भील तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत राहिला. त्यामुळे ती गर्भवती राहिली. आई तिला डॉक्टरकडे घेऊन गेली तेव्हा ती गर्भवती असल्याचं समजलं. ती १३ आठवड्यांची गर्भवती होती. त्यानंतर महिलेने पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर कोर्टाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. पण तो कोर्टातून फरार झाला.