राजीव गांधी हत्या : २७ वर्षांनी दोषी आरोपी नलिनीला मिळाला ३० दिवसांचा पॅरोल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 07:09 PM2019-07-05T19:09:08+5:302019-07-05T19:11:25+5:30
२७ वर्षाच्या तुरुंगवासानंतर ३० दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे.
नवी दिल्ली - भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आरोपी नलिनीला २७ वर्षाच्या तुरुंगवासानंतर ३० दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. हा निर्णय मद्रास हायकोर्टाने घेतला आहे. राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणात नलिनीला आयुष्यभरासाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. २००० साली तिची फाशीची शिक्षा माफ करून तिला आयुष्यभरासाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. २८ जानेवारी १९९८ मध्ये तिला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. ही शिक्षा दोन वर्षांनी माफ करून तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. कोर्टाने तामिळनाडू सरकारला नलिनी यांच्या पॅरोलची प्रक्रिया १० दिवसात पूर्ण करून त्यांना तुरुंगाबाहेर सोडून द्या असे निर्देश दिले आहेत. तसेच पॅरोलवर सुटल्यावर कोणलाही मुलाखत देऊ नये आणि राजकीय व्यक्तींना भेटू असे कोर्टाने नलिनी यांना सांगितले आहे.
Rajiv Gandhi Assassination case: Convict Nalini gets 30 day parole from Madras High Court. pic.twitter.com/ZWVo76LxlN
— ANI (@ANI) July 5, 2019