शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

धक्कादायक! विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या, घटनेने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 8:20 AM

Vishwa Hindu Parishad leader Mukesh Soni : विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे खलारी ब्लॉक अध्यक्ष मुकेश सोनी यांची खलारी पोलीस स्टेशन हद्दीतील मॅक्लुस्कीगंजजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

नवी दिल्ली - झारखंडची (Jharkhand) राजधानी रांची (Ranchi) मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विश्व हिंदू परिषदेच्या (Vishwa Hindu Parishad) नेत्याची हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे खलारी ब्लॉक अध्यक्ष मुकेश सोनी (Mukesh Soni) यांची बुधवारी खलारी पोलीस स्टेशन हद्दीतील मॅक्लुस्कीगंजजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मुकेश सोनी हे खलारी येथील महावीर नगरमध्ये राहत होते आणि मॅक्लुस्कीगंज येथील धुर्वा मोरजवळ प्रधान ज्वेलर्स नावाचं दागिन्यांचं दुकान होतं.

मुकेश संध्याकाळी आपलं दुकान बंद करून घरी परत जात होते. याच दरम्यान, बकुळीया तांडजवळ त्याच्यावर दोन गोळ्या झाडण्यात आल्या. एका नागरिकाने दिलेल्या माहितीवरून काही लोकांनी घटनास्थळ गाठून जखमी मुकेश सोनी यांना डाक्रा रुग्णालयात नेलं, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. मुकेश यांच्या हत्येची माहिती मिळताच संपूर्ण खलारीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. अलीकडच्या काळात मुकेश फायर ब्रँड हिंदू नेता म्हणून आपली छाप पाडत होते. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

भाजपा आणि संघ विचार परिवाराच्या कार्यकर्त्यांना केलं जातं टार्गेट 

स्थानिक आमदार समरीलाल यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला असून या घटनेच्या निषेधार्थ विधानसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जाणार नसून खलारी येथे जाणार असल्याचं सांगितलं आहे. विश्व हिंदू परिषद खलारी ब्लॉक अध्यक्ष मुकेश सोनी यांची गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणी खासदार संजय सेठ यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. भाजपा, आरएसएस, विश्व हिंदू परिषद या संघटनांच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य केलं जात आहे. भाजपा आणि संघ विचार परिवाराच्या कार्यकर्त्यांना टार्गेट केलं जात असल्याचं खासदार यांनी म्हटलं आहे.

झारखंडला केरळ आणि पश्चिम बंगाल बनवण्याचा डाव

टार्गेट करून नुकसान केलं जात आहे. त्यांची हत्या केली जात आहे. झारखंडला केरळ आणि पश्चिम बंगाल बनवण्याचे षडयंत्र सुरू असल्याचं देखील खासदारांनी म्हटलं आहे. दुकान बंद करून घरी जात असणाऱ्या एका व्यावसायिकाची आणि सामान्य नागरिकाची हत्या केली जाते ही अत्यंत दु:खद घटना आहे. झारखंडमधील गुन्हेगारी देखील वाढत असल्याचं हे उदाहरण आहे. तसेच गुन्हेगारांना राजकीय संरक्षण देखील मिळत आहे. त्यामुळेच ते अशा प्रकारचं कृत्य करत असल्याच देखील म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ