Ranchi Violence:रांचीमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर झालेल्या हिंसाचारात दोन मुस्लिम तरुणांचा मृत्यू झाला, त्यापैकी एकाचे नाव साहिल आहे. मृत तरुणाच्या वडिलांनी एबीपी न्यूजच्या टीमशी संवाद साधला आणि दावा केला की, 'त्यांचा मुलगा हिंसाचारात सहभागी नव्हता'. पोलिसांवर आरोप करताना ते असेही म्हणाला की, 'पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या.'
मृताचे वडील मोहम्मद अफजल यांनी एबीपी न्यूजला सांगितले की, माझा मुलगा साहिल हिंसाचारात सहभागी नव्हता. शुक्रवारी ही घटना घडलेल्या मुख्य रस्त्यावरील एका दुकानात साहिल कामाला होता. हिंसाचार सुरू झाल्यावर सर्व दुकाने बंद होऊ लागली. माझा मुलगा मुख्य रस्त्याने घरी जात असताना पोलिसांनी त्याच्या पाठीमागे गोळी झाडली. मोहम्मद अफझल यांनी दावा केला की, "माझा मुलगा आंदोलनात सहभागी नव्हता. मी पोलिसांवर गुन्हा दाखल केला आहे, मला न्याय आणि नुकसानभरपाई हवी आहे."
माझ्या एकुलत्या एक मुलाला गोळ्या का घातल्या?, त्याचा दोष काय?; आईचा संतप्त सवालइस्लाम जिंदाबाद, नुपूर शर्मा मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्याशुक्रवारच्या नवाजनंतर मोठ्या संख्येने मुस्लीम समाजाचे लोक मुख्य मार्गावर निदर्शने करत असल्याचे सांगण्यात येत होते. इस्लाम जिंदाबाद, नुपूर शर्मा मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. घटनेच्या दिवशी स्थानिक मुलांचा निदर्शनात सहभाग होता पण सर्वजण शांततेने निदर्शने करत होते. पोलिसांच्या मागे उभ्या असलेल्या लोकांनी आधी दगडफेक केल्याचा दावा केला जात आहे, त्यानंतर आंदोलक संतप्त झाले आणि पोलिसांनी टोकाचे पाऊल उचलले. काही वेळातच निदर्शनाचे हिंसाचारात रूपांतर झाले. आंदोलकांनी दगडफेक सुरू केली. मंदिर आणि आजूबाजूची दुकाने, वाहने, पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी गोळीबार सुरू केला. ज्यात दोन आंदोलकांचा मृत्यू झाला.