ठाणे : ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्याकडून एक लाख रूपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी बिनु वर्गिस आणि योगेश मुंदरा या दोघांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नौपाडा पोलीस ठाण्यात त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आॅगस्ट २०२० मध्ये त्यांच्याकडे दिवा प्रभाग समितीचा कार्यभारअसताना बिनु वर्गिस याने त्यांची शैक्षणिक कागदपत्रे बनावट असल्याचे सांगत १० लाख रुपयांची खंडणी मागितली. बिनु हा वारंवार बदनामीची धमकी देत असल्याने तसेच साथिदार योगेश मुंदरा याच्या मार्फत माहिती अधिकार अर्ज करत असल्याने आहेर यांनी त्याला एक लाख रूपये दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात बिनु आणि त्याचा साथिदार योगश मुंदरा या दोघांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.