Ram Rahim Rape Case: बलात्कारी राम राहीमला दणका; हायकोर्टाने फेटाळला पॅरोल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 03:07 PM2019-08-27T15:07:53+5:302019-08-27T15:10:39+5:30
Ram Rahim Rape Case: आज सुनावणी पार पडली असून हायकोर्टाने दणका देत पॅरोल फेटाळून लावला आहे.
चंदीगड - डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमलाबलात्कार प्रकरणी सध्या तुरुंगात असून त्याचा पॅरोल पंजाब व हरियाणा हायकोर्टाने आज फेटाळला आहे. राम राहीमच्या पत्नीने पॅरोल अर्ज हायकोर्टात दाखल केला होता. त्यावर आज सुनावणी पार पडली असून हायकोर्टाने दणका देत पॅरोल फेटाळून लावला आहे.
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमलाबलात्कार प्रकरणी 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ऑगस्ट २०१८ मध्ये सुनावण्यात आली होती. न्यायालयाने बाबा राम रहीमला दोषी ठरवलं होतं. दोषी ठरवल्यानंतर झालेला हिंसाचार लक्षात घेता तुरुंगातच न्यायालय भरवून शिक्षा सुनावण्यात आली. निकाल सुनावण्यासाठी न्यायाधीशांना विशेष हेलिकॉप्टरने रोहतकच्या तुरुंगात आणण्यात आलं होतं. राज्यातही प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान त्यावेळी न्यायालायने 10 वर्षांची शिक्षा सुनावली. राम रहीम कोर्टरुममध्ये हात जोडून उभा असून दयेसाठी याचना करत होता. इतकंच नाही तर रडूही लागला होता. 2002मध्ये हे बलात्कार प्रकरण उजेडात आले होते.
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला बलात्कार प्रकरणी तुरुंगात असून त्याचा पॅरोल पंजाब व हरियाणा हायकोर्टाने फेटाळला https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) August 27, 2019
Punjab and Haryana High Court has rejected parole plea of Dera Sacha Sauda chief & rape convict Gurmeet Ram Rahim Singh. The plea was filed by his wife. pic.twitter.com/Hu9hkaydRr
— ANI (@ANI) August 27, 2019