बलात्कार प्रकरण : स्वामी चिन्मयानंद यांना हायकोर्टाने मंजूर केला जामीन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 03:14 PM2020-02-03T15:14:27+5:302020-02-03T15:18:05+5:30
संबंधित तरुणी आणि तिच्या अन्य तीन सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता.
प्रगायराज - बलात्कार प्रकरणी इलाहाबाद हायकोर्टाने माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद यांना जामीन मंजूर केला आहे. शाहजहांपुर जेलमध्ये गेल्या १३५ दिवसांपासून स्वामी चिन्मयानंद या बलात्कारप्रकरणी बंदिस्त होते. मात्र, हायकोर्टाने त्यांना जामीन मंजूर केल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र, सप्टेंबर महिन्यात बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरुणीला अटक करण्यात आली होती. स्वामी चिन्मयानंद यांच्याकडे खंडणी मागितल्याचा आरोप या तरुणीवर ठेवण्यात आला आहे. यासंदर्भातील एक व्हिडीओ समोर आला होता असून, त्यानंतर संबंधित तरुणी आणि तिच्या अन्य तीन सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता.
Allahabad High Court grants bail to Former Union Minister and BJP leader Swami Chinmayanand in the alleged rape case of a law student. pic.twitter.com/MiQTXrrs5L
— ANI UP (@ANINewsUP) February 3, 2020
चिन्मयानंद हे पक्षाचे सदस्य नाहीत; शहाजहानपूर बलात्कार प्रकरणातून भाजपाने हात झटकले
भाजपा नेते चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी तरुणी अटकेत
धक्कादायक ! चिन्मयानंदांविरुद्ध बलात्काराचा गुन्हाच नाही, पीडित मुलीवरच खटला
भाजप नेते चिन्मयानंद यांना बलात्कारप्रकरणी अटक
तत्पूर्वी स्वामी चिन्मयानंद यांच्याकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी एसआयटीने पीडितेचे मित्र विक्रम आणि सचिन यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर न्यायालयाने त्यांना ९५ तासांची कोठडी दिली होती. उत्तर प्रदेशचे डीजीपी ओ.पी. सिंह यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले होते की, ''स्वामी चिन्मयानंद यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या विधी (लॉ) महाविद्यालयातील संबंधित विद्यार्थिनीला एसआयटीने अटक केली. तिच्यावर चिन्मयानंद यांच्याकडे खंडणी मागितल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.''
विधि महाविद्यालयाच्या एका विद्यार्थिनीने भाजप नेते चिन्मयानंद यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर सदर तरुणीने केलेल्या आरोपांचा तपास करण्यासाठी आयजी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानेउत्तर प्रदेश सरकारला दिले होते. त्यानंतर बलात्काराचा आरोप झालेले माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद यांना अटक करण्यात आली होती.