शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

Shahnawaz Hussain: भाजपाच्या शाहनवाज हुसैनांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल होणार; कोर्टाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 10:28 AM

दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती आशा मेनन यांच्या खंडपीठाने पोलिसांना काही वर्षांपूर्वी एका महिलेने दिलेल्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

केंद्रात आणि बिहार सरकारमध्ये मंत्री राहिलेले भाजपा नेते शाहनवाज हुसैन यांना मोठा झटका बसला आहे. हुसैन यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल होणार आहे. 

एका जुन्या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने पोलिसांना हे आदेश दिले आहेत. शाहनवाज हुसैन यांच्याविरुद्ध बलात्कारासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यास न्यायालयाने सांगितले आहे. यामुळे हुसैन यांच्या अडचणी वाढणार आहेत. याचबरोबर पोलिसांनी तीन महिन्यांत या प्रकरणाचा तपास करावा, असेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती आशा मेनन यांच्या खंडपीठाने पोलिसांना काही वर्षांपूर्वी एका महिलेने दिलेल्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. महिलेकडून सादर करण्य़ात आलेल्या गोष्टींवरून पोलिसांनीच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचे दिसून येत आहे, असे निरीक्षण न्यायमूर्तींनी नोंदविले आहे. तसेच पोलिसांनी जो रिपोर्ट कनिष्ठ न्यायालयात सादर करण्यात आला तो देखील अंतिम रिपोर्ट नव्हता असे म्हटले आहे. 

जानेवारी 2018 मध्ये दिल्लीस्थित महिलेने कनिष्ठ न्यायालयात याचिका दाखल करून हुसैन यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. छतरपूर फार्म हाऊसमध्ये शाहनवाज हुसैन यांनी आपल्यावर बलात्कार केला आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप महिलेने केला होता. कनिष्ठ कोर्टाने देखील आपल्या निर्णयात पोलिसांचा युक्तिवाद नाकारला होता, कोर्टाने म्हटले होते की महिलेच्या तक्रारीत दखलपात्र गुन्हा आहे.

शाहनवाज हुसैन कोण?शाहनवाज हुसैन हे बिहारचे विधानपरिषद आमदार आहेत. बिहारमधील जेडीयू-भाजप युती सरकारमध्ये ते मंत्रीही होते. ते तीनवेळा खासदारही होते. 1999 मध्ये ते किशन गंजमधून खासदार झाले. मात्र, 2004 मध्ये त्यांना या जागेवर पराभवाला सामोरे जावे लागले होते. यानंतर 2006 मध्ये भागलपूरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत विजय मिळवून ते लोकसभेत पोहोचले. 2009 मध्येही ते येथून विजयी झाले होते. मात्र, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. ते वाजपेयी सरकारमध्ये मंत्रीही राहिले आहेत.

टॅग्स :BJPभाजपाCourtन्यायालय