राजस्थान - राजस्थान येथील सिरोही येथे एका कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशात महिलांवर वाढलेल्या अत्याचारानंतर महिला सुरक्षेचा एक गंभीर प्रश्न असल्याचे म्हणत चिंता व्यक्त केली आहे. पॉक्सो कायद्यांतर्गत बलात्कार प्रकरणातील दोषींना दया याचिका दाखल करण्याचा अधिकार देण्यात येऊ नये आणि संसदेत अशा दाखल दया याचिकांचा आढावा घेण्यात यावा असं कोविंद पुढे या कार्यक्रमात म्हणाले.
पॉक्सो म्हणजेच बाललैंगिक अत्याचारांपासून मुलींचे संरक्षण करणाऱ्या कायद्यात गुन्हेगारांना दयेचा अर्ज करण्याची जी तरतूद, अधिकार आहे. त्यावर संसदेत पुनर्विचार व्हायला पाहिजे असे मत राष्ट्रपतींनी मांडले. सिरोही येथील एका कार्यक्रमात राष्ट्रपती कोविंद बोलत होते. त्यांनी यावेळी महिला सुरक्षेवर चिंता व्यक्त केली. महिलांवरील विविध प्रकारचे अत्याचार रोखण्यासाठी समाजात त्यांच्याविषयी आदर आणि सन्मान वाढायला हवा. त्यामुळे अशा अत्याचाराच्या घटना रोखण्यात मोठा हातभार लागेल.