मुंबई - पुण्यातील २७ वर्षीय इंजिनीअर तरुणीला अडीच महिने घरात डांबून बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना अंधेरीतील लोखंडवाला परिसरात घडली आहे. फेसबुकच्या माध्यमातून ओळख झालेल्या पीडित तरुणीने आरोपीशी लग्नास नकार दिल्याने त्याने तरुणीला आपल्या घरात जुलै ते ऑगस्टदरम्यान डांबून ठेवलं होतं. तरुणीवर लैंगिक अत्याचार करताना आरोपी तरुणाने सर्व सीमा ओलांडल्या होत्या. अखेर मांजरीमुळे एक ते दिड महिन्यांनी आरोपीच्या तावडीतून तरुणीला पळ काढता आला. तेथून पळ काढताच तरुणीने पुण्यातील आपल्या बहिणीचं घर गाठलं आणि पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. यानतंर ओशिवरा पोलिसांनी कारवाई करत आरोपी सय्यद आमीर मन्सूर हुसेन उर्फ शिरोज उर्फ शमी याला त्याच्या अंधेरी येथील घरातून अटक केली. आरोपी शमीला २ सप्टेंबरला अटक करण्यात आली असून १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश पासलवाड यांनी दिली.
फेसबुकच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली होती. ओळख झाल्यानंतर आरोपी शमीने पीडित तरुणीला अंधेरीतील आपल्या घरी बोलावले आणि तिला गोड पदार्थातून गुंगीचं औषध दिल. तरुणी एका वर्षांपूर्वी गोव्यातून पुण्याला एक हॉस्टेलमध्ये शिफ्ट झाली होती. गोड पदार्थ खाल्ल्यानंतर तरुणी बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. तरुणी शुद्धीत आल्यानंतर आरोपी शमीने तिला मोबाइलमध्ये बलात्कार करतानाचा शूट केलेला व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला जुलै आणि ऑगस्टदरम्यान तरुणीला आपल्या घरात डांबून ठेवले. आरोपीच्या घरी त्याची आई आणि भाऊ राहत असून त्यांना देखील मुलीला डांबून ठेवल्याची कल्पना होती. दरम्यान, तो सतत तरुणीवर बलात्कार करत होता. तसेच चामड्याच्या पट्ट्याने मारहाणही करत होता. त्याने तरुणीचं डेबिट कार्ड काढून घेऊन त्यातून ४० हजार रुपये काढून घेतले होते. तसेच मुलगी पळून जाऊ नये म्हणून आरोपीने तिचे कपडे फाडले होते. तर तिला कोणी ओळखू नये म्हणून तिचे केस कापून हेअरस्टाईल बदलली होती. आरोपीच्या घरात ४ ते ५ मांजरं असून १ मांजर बाल्कनीतून खाली पडलं. त्यादिवशी आरोपीच्या आईने पीडित तरुणीला मांजराला आणायला तिला खाली पाठवले. त्याचवेळी संधी साधत पीडित तरुणीने स्वतःचा बचाव करत पाल काढला आणि पुणे गाठले. तरुणीने पोलीस स्टेशनमध्ये केलेल्या तक्रारीत ३० जूनला आरोपी हुसेनने आपल्या सोडून दिल्याचं सांगितलं आहे. ‘मात्र यादरम्यान तो सतत माझा पाठलाग करत होता. ३ जूनला त्याने फोन करुन घरी आली नाहीस तर तुझा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करेन अशी धमकी दिली. ३ जुलैला त्याने मला पुन्हा त्याच्या घरी जाण्यास भाग पाडलं’, असं तरुणीने तक्रारीत सांगितलं आहे.