आजकाल शरीराच्या कोणत्याही अंगावर टॅटू काढून घेण्याची क्रेझ आली आहे. परंतू याच क्रेझने जवळपास दोन डझन तरुणी, महिलांची इज्जत लुटली गेली आहे. केरळमधील कोच्ची शहरातील एका टॅटू पार्लरमुळे मोठी खळबळ उडाली आहे. १८ वर्षांच्या कॉलेज तरुणीने तिच्यावर बलात्कार झाल्याची तक्रार सोशल मीडियावर टाकल्यानंतर सारा प्रकार उघड झाला आहे.
कोची पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेत कारवाईला सुरुवात केली आहे. या पोस्टमुळे २०हून अधिक महिला समोर आल्या असून त्यांनीही आरोपीवर बलात्कार, लैंगिक शोषण केल्याची तक्रार केली आहे. तक्रारदार तरुणीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ती लोवर बॅकवर टॅटू काढण्यासाठी टॅटू पार्लरमध्ये गेली होती. यासाठी तिला प्रायव्हसीची गरज होती. याचा फायदा उठवून टॅटू आर्टिस्टने तिला लैंगिक प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. यामुळे तिला विचित्र वाटू लागले. यानंतर या टॅटू वाल्याने मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला.
पीडितेला तिथून सुटका करून घ्यायची होती. परंतू ती अशी अडकली की तिथे ती एक शब्दही बोलू शकली नाही. मी त्याला रोखू शकले नाही. मला वाटत होते की मी तिथेच मरून जावे. मी त्याला नाही सुद्धा म्हटले नाही. मी संपल्याचे मला वाटू लागले होते, असे तिने सांगितले. पीडितेच्या पोस्टनंतर, आणखी दोन महिला पुढे आल्या ज्यांनी त्याच टॅटू पार्लरबद्दल अशाच घटनेचा उल्लेख केला. त्यापैकी एकीने इन्स्टावर याबाबत पोस्ट केली होती. तेव्हा तिला आणखी २० महिलांनी आपल्यासोबतही असाच प्रकार घडल्याचे म्हटले होते.
इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अशा परिस्थितीत मुलीची लेखी तक्रार आवश्यक आहे. त्यानंतर आम्ही मेडिकल करू. आम्ही त्या नंबरवर बोललो, त्यानंतर एका व्यक्तीने फोन उचलला आणि काही वेळात सांगेन की लेखी तक्रार करायची आहे की नाही, असे सांगितले. मात्र, टॅटू स्टुडिओ सध्या बंद आहे. त्याचे घरही बंद आहे.