पुणे : पती व मुलींना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने तीस वर्षीय विवाहितेवर बलात्कार केल्याने प्रबोधन सुनील गोरे (वय:२६, ज्ञानेश्वर नगर, कोंढवा खुर्द, पुणे) यांस सिंहगड रस्ता पोलिसांनीअटक केली आहे.फिर्यादी महिला पती व दोन मुलींसह कोंढवा खुर्द येथे राहत असून आरोपी व महिलेचा पती हे मित्र आहेत.त्यामुळे आरोपीचे महिलेच्या घरी येणे जाणे असल्याने महिलेची आरोपीशी ओळख होती. ६ मे रोजी सदर फिर्यादी महिलेच्या पायाला लागल्याने नऱ्हे येथील नवले हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आली असता आरोपी नवले हॉस्पिटलच्या बाहेर थांबलेला दिसला. त्यावेळी महिलेने त्यास ओळख दाखविली असता त्याने मला तू खूप आवडतेस, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. त्यावेळेस महिलेने माझे लग्न झाले असून तुझ्यासोबत लग्न करणे शक्य नसल्याचे सांगताच आरोपीने तु माझ्या सोबत ये नाहीतर तुझ्या पतीला व मुलींना ठार मारून टाकेन असे सांगत सदर महिलेस गाडीवर बसवून नऱ्हे येथील लॉजवर घेऊन गेला. त्यावेळी आरोपीने महिलेबरोबर शारीरिक संबंध प्रस्थपित केले. तसेच तू याबद्दल घरी कोणास सांगितले तर बघ अशी धमकीही त्याने दिली. अशाप्रकारे आरोपीने महिलेस वेळोवेळी एकटे गाठून जबरदस्तीने शारीरिक संबंध निर्माण केले. मात्र महिलेने ही गोष्ट आपल्या पतीला सांगितली. त्यानंतर पतीने पत्नीस धीर देऊन पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले. वेळोवेळी जबरदस्तीने महिलेच्या संमतीशिवाय शारीरिक संबंध निर्माण केल्याने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनोद महांगडे पुढील तपास करीत आहेत.
पती व मुलाला ठार मारण्याची धमकी देत विवाहितेवर बलात्कार; नऱ्हे येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 13:39 IST
आरोपी व फिर्यादी महिलेचा पती हे मित्र आहेत. त्यामुळे आरोपीचे महिलेच्या घरी येणे जाणे होते.
पती व मुलाला ठार मारण्याची धमकी देत विवाहितेवर बलात्कार; नऱ्हे येथील घटना
ठळक मुद्देमहिलेच्या संमतीशिवाय शारीरिक संबंध निर्माण केल्याने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक