शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

"देशात बलात्कार, हत्या, अपहरणाच्या, जातीय दंगलीच्या घटना घटल्या"; गृहमंत्रालयाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 11:36 AM

Crime News : सरकार सर्व गुन्ह्यांच्या नोंदींचं डिजिटलीकरण करणार असल्याचंही राज्यसभेत सांगण्यात आलं आहे.

नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यसभेत देशातील बलात्कार आणि जातीय दंगली घटना कमी झाल्या आहेत अशी माहिती दिली आहे. तसेच सरकार सर्व गुन्ह्यांच्या नोंदींचं डिजिटलीकरण करणार असल्याचंही राज्यसभेत सांगण्यात आलं आहे.

जातीय दंगलींना आळा

गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत लिखित उत्तर दिलं आहे. त्यात त्यांनी ही माहिती दिली आहे. राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार 2019 मध्ये देशातील जातीय दंगलींच्या संख्येत घट झाली आहे. विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील पोलिसांनी 2019 मध्ये या प्रकारचे 440 प्रकरणे दाखल करून घेतले. 2018 मध्ये या गुन्ह्यांची संख्या 512 होती.

बलात्कारांच्या घटनाही झाल्या कमी

बलात्कार, हत्या आणि अपहरणाच्या घटनाही कमी झाल्याचं गृहमंत्रालयाने म्हटलं आहे. 2019 मध्ये देशात बलात्काराच्या 32,033, हत्येच्या 28, 918 आणि अपहरणाच्या 1,05,037 घटना घडल्या. 2018 मध्ये बलात्काराच्या 33,356, हत्येच्या 29,017 आणि अपहरणाच्या 1,05,734 घटना घडल्या.

देशात घडणाऱ्या सर्व गुन्ह्यांचे डिजिटलीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. Crime and Criminal Tracking Network and Systems वर आतापर्यंत 30.81 कोटी आकडे उपलब्ध करून देण्यात आल्याचंही गृह विभागाने स्पष्ट केलं आहे.

बांगलादेशातून सर्वाधिक घुसखोरी

2018 ते 2020 दरम्यान, भारतात बेकायदेशीररित्या घुसखोरीच्या घटना घडल्या आहेत. या काळात पाकिस्तानातून 116, बांगलादेशातून 2812 आणि म्यानमारमधून 325 लोकांनी घुसखोरी केल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

डिजिटल जनगणना होणार

देशात 2021मध्ये डिजिटल जनगणना होणार आहे. ही देशातील पहिली डिजिटली जनगणना असेल असं नित्यानंद राय यांनी लेखी उत्तरात म्हटलं आहे. या जनगणनेसाठी 8754.23 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

इंटरनेट शटडाऊनची संख्या नाही

देशात किती वेळा इंटरनेट शटडाऊन करण्यात आला असा सवाल केंद्राला विचारण्यात आला होता. मात्र केंद्राकडे त्याचं उत्तर नाही. दंगल किंवा तणावाच्या स्थितीत इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय सरकारकडून घेतला जातो. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात येतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :IndiaभारतCrime Newsगुन्हेगारी