शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

महिलेला महापालिकेत नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार, जनसंपर्क अधिकारी भदाणेचा प्रताप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 4:07 PM

Rape Case : एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सदानंद नाईकउल्हासनगर : महापालिकेचा वादग्रस्त व फरार जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे याने २९ वर्षीय महिलेला उल्हासनगर महापालिकेत नोकरीचे आमिष दाखवून तुर्भे नवीमुंबई येथील लॉजवर नेऊन बलात्कार केला. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात शनिवारी २६ फेब्रुवारी रोजी रात्री साडे आठ वाजता गुन्हा दाखल झाला असून सदर घटना नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घडली आहे.उल्हासनगर महापालिकेत जनसंपर्क अधिकारी पदाच्या नोकरीसाठी शाळा सोडण्याच्या जन्मदाखल्यात फेरफार केल्या प्रकरणी, गेल्या सोमवारी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तेंव्हा पासून भदाणे फरार असून पोलीस त्याच्या मार्गावर आहेत. महापालिका आयुक्तांच्या आदेशाने सहाय्यक आयुक्त अत्युत सासे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. दरम्यान शनिवारी रात्री साडे आठ वाजता नवीमुंबई तुर्भे येथील एपीएमसी पोलीस ठाण्यात भदाणे यांच्यावर एका २९ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. पीडित महिला ही शहरातील कॅम्प नं-२ रमाबाई आंबेडकरनगर येथील राहणारी असून तीला महापालिकेत नोकरीचे आमिष दाखविले होते.नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पांढऱ्या कार मध्ये चोपडा कोर्ट येथून सायंकाळी साडे सात वाजता नवीमुंबई तुर्भे येथील एका लॉज मध्ये भदाणे घेऊन गेला होता. तेथे महिलेवर जबरीने अत्याचार केला. घाबरलेल्या महिलेने अखेर शनिवारी तुर्भे येथील एपीएमसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केल्यावर, पोलिसांनी भदाणे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त डी टी टेळे यांनी दिली. मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर भदाणे फरार असून पोलीस पथके त्याच्या मार्गावर आहेत. मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गेल्या सोमवारी वादग्रस्त जनसंपर्क अधिकारी भदाणे यांच्यावर गुन्हा दाखल होऊनही, पोलिसांनी त्याला अटक केली नाही. याबाबत तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. तर दुसरीकडे महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी भदाणे यांच्या निलंबनाची फाईलवर सही का केली नाही. याबाबत सर्वस्तरातून आयुक्तवर टीकेची झोळ उठली आहे. महापालिका निवडणूक येत्या दोन महिन्यावर येऊन ठेपली असून असे थंड आयुक्त नको. अशी भूमिका राजकीय पक्षाचे नेते खाजगीत व्यक्त करीत आहेत. परिणामी ऐन महापालिका निवडणुकीपूर्वी आयुक्त राजनिधी यांची उचलबांगडी होण्याची चर्चाही शहरात रंगली आहे.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळjobनोकरीulhasnagarउल्हासनगरPoliceपोलिसMuncipal Corporationनगर पालिका