शहरं
Join us  
Trending Stories
1
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत सत्तेत आलो असं छगन भुजबळ म्हणाले"; पुस्तकात खळबळजनक दावा
2
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
3
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
4
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
5
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
6
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
7
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
8
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
9
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
10
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक
12
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
13
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
14
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
15
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
16
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
17
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
18
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
19
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
20
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा

चालत्या ट्रेनमध्ये बलात्कार पीडित तरुणीची आत्महत्या; CCTV मध्ये कैद झाली २१ मिनिटं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 9:31 PM

Rape Victim committed Suicide : तरुणी २१ मिनिटे सुरतमध्ये असल्याचे तपासात समोर आले आहे. तिला नवसारीला जायचे होते, पण वलसाडमध्ये रेल्वेत त्याचा मृतदेह सापडला.

गुजरात क्वीन ट्रेनमध्ये १९ वर्षीय तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याप्रकरणी अहमदाबाद क्राइम ब्रँच सुरतमध्ये पोहोचली आहे. ही टीम एक दिवस सुरतमध्ये राहून या प्रकरणाशी संबंधित पुरावे गोळा करणार आहे. सुरत रेल्वे स्टेशनच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुलगी चालताना दिसत आहे. तरुणी २१ मिनिटे सुरतमध्ये असल्याचे तपासात समोर आले आहे. तिला नवसारीला जायचे होते, पण वलसाडमध्ये रेल्वेत त्याचा मृतदेह सापडला.भावाचा मोबाईल घेऊन ती घराबाहेर पडली आणि एका शिक्षिकेला भेटायला जात असल्याचे सांगितले. ती बसने सुरतला आली होती. बस डेपोपासून रेल्वे स्टेशनपर्यंत सुमारे २१ मिनिटे ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत होती. बसस्थानक आणि रेल्वे स्थानकाजवळील हॉटेल्समध्ये गुन्हे शाखा तपास करणार आहे. या प्रकरणात, वडोदरा शहर पोलीस, अहमदाबाद शहर गुन्हे शाखा, न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा आणि रेल्वे पोलिसांसह २५ पथके कार्यरत आहेत. सुमारे ४५० सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात आले आहेत.

गुजरातच्या क्वीन ट्रेनमध्ये गळफास 

नवसारी येथील १९ वर्षीय तरुणी एका सामाजिक सेवा संस्थेत काम करत होती. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी नवसारी येथील भक्तीनगर येथील जलाराम बापा मंदिराजवळ राहात असून ती वडोदरा येथील महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकत होती. ती वडोदरा येथून नवसारी येथील आपल्या घरी जात असताना तिने आईला कामासाठी मरोली येथे जात असल्याचे सांगितले. १० नोव्हेंबर रोजी गुजरात क्वीन ट्रेनच्या डी-12 कोचमध्ये तिचा मृतदेह दुपट्ट्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. पीडितेने तिच्या डायरीत वडोदरा येथे एका ऑटो-रिक्षातून दोन पुरुषांनी डोळ्यावर पट्टी बांधून एका निर्जन ठिकाणी नेल्याचा उल्लेख केला आहे. पोलीस सामूहिक बलात्काराच्या अँगलने तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूGujaratगुजरातSuratसूरतPoliceपोलिसauto rickshawऑटो रिक्षा