शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
2
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
3
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
4
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
5
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
6
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
7
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
8
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
9
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
10
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
11
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
12
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
13
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
14
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
15
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
16
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
17
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
18
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
19
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
20
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

बलात्कारपीडित दलित मुलीला जिवंत जाळले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2020 1:33 AM

crime news: उत्तरप्रदेशातील घटना; तीन जणांना अटक

बुलंदशहर : उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहर येथील एका १५ वर्षे वयाच्या दलित मुलीला जिवंत जाळल्याची भीषण घटना घडली. गंभीररीत्या भाजलेली ही  मुलगी दिल्लीच्या राममनोहर लोहिया रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी मरण पावली. या मुलीवर बलात्कार झाल्याची तक्रार यापूर्वी पोलिसांत नोंदविण्यात आली होती. या जळीतप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

या मुलीच्या घरात सात जण शिरले व तिच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळले, अशी तक्रार आता पोलिसांत दाखल झाली आहे. या मुलीचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर झळकला आहे. त्यात ती म्हणते की, ज्यांनी यापूर्वी माझ्यावर लैंगिक अत्याचार केला तेच लोक आज आमच्या घरात शिरले होते.

बुलंदशहरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक संतोषकुमार सिंह यांनी सांगितले की, एका व्यक्तीने बलात्कार केल्याची तक्रार या मुलीने ऑगस्ट महिन्यात पोलिसांकडे दाखल केली होती. याप्रकरणी संबंधित आरोपीला अटक झाली आहे. बलात्कारपीडित मुलीला जिवंत जाळण्यात आल्याची माहिती पोलिसांना मंगळवारी मिळाली. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सातपैकी तीन आरोपींना अटक केली आहे. (वृत्तसंस्था) 

तक्रार मागे घेण्यासाठी दबावमुलीवर बलात्कार केल्याची तक्रार मागे घेतली नाही म्हणून आरोपीशी संबंधित लोकांनी या मुलीलाच जिवंत जाळण्याचे भीषण कृत्य केले असा दावा बलात्कारपीडितेच्या कुटुंबियांनी केला आहे.

टॅग्स :Rapeबलात्कार