बलात्कार पीडितेला आरोपीसोबत बांधून काढली धिंड; संतापलेली उर्मिला मातोंडकर म्हणाली... अमानवता 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 06:56 PM2021-03-29T18:56:03+5:302021-03-29T18:56:51+5:30

Rape victim tied up with accused in Madhya Pradesh : उर्मिला यांनी ट्वीट करत हे प्रकरण 'अमानुष' असे वर्णन केले आणि आपण येथे कसे पोहोचलो असा सवाल देखील केला आहे.

Rape victim tied up with accused; Angry Urmila Matondkar said ... inhumanity | बलात्कार पीडितेला आरोपीसोबत बांधून काढली धिंड; संतापलेली उर्मिला मातोंडकर म्हणाली... अमानवता 

बलात्कार पीडितेला आरोपीसोबत बांधून काढली धिंड; संतापलेली उर्मिला मातोंडकर म्हणाली... अमानवता 

googlenewsNext
ठळक मुद्दे मध्य प्रदेशच्या या घटनेसंदर्भात अभिनेत्री आणि शिवसेनेत अलीकडेच प्रवेश केलेल्या उर्मिला मातोंडकर यांचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली - मध्य प्रदेशच्या अलिराजपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर ग्रामस्थांनी पीडितेला दोरीने बांधले आणि गावभर धिंड काढली. आश्चर्याची बाब म्हणजे पीडितेला आरोपीसोबत बांधून ठेवलेला नराधम हा जवळचा नातेवाईक होता. बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचे लक्ष देखील या प्रकरणाने वेधले असून मातोंडकर यांनी असंतोष व्यक्त आहे. उर्मिला यांनी ट्वीट करत हे प्रकरण 'अमानुष' असे वर्णन केले आणि आपण येथे कसे पोहोचलो असा सवाल देखील केला आहे.

मध्य प्रदेशच्या या घटनेसंदर्भात अभिनेत्री आणि शिवसेनेत अलीकडेच प्रवेश केलेल्या उर्मिला मातोंडकर यांचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचप्रमाणे चाहतेही यावर बऱ्याच कमेंट्स देत आहेत. याप्रकरणी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना उर्मिला मातोंडकर यांनी लिहिले, "हे ... माझी हैराणी माझ्या शब्दापलीकडे आहे. मध्य प्रदेशातील बलात्कार १६ वर्षीय पीडितेला आरोपीसह बांधले गेले आहे आणि 'भारत माता की जय' अशी घोषणा दिली जात आहे. गावभर त्यांची धिंड काढली. आपण इथपर्यंत कसे पोहोचलो आहोत. हा अमानुषपणा वेगळ्या स्तरावर आहे. " या प्रकरणाशी संबंधित व्हिडिओही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.


मध्य प्रदेशमधील अलिराजपूर जिल्ह्यातील गावात रविवारी एका २१ वर्षांच्या मुलीवर १६ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची माहिती आहे. हे कळताच पीडितेच्या कुटूंबाने अल्पवयीन मुलीला आणि आरोपी दोघांनाही दोरीने बांधून मारहाण केली. त्यानंतर गावभर धिंड काढून त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला. मात्र या प्रकरणात बलात्काराच्या आरोपींसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

लज्जास्पद! बलात्कार पीडितेला नातेवाईकांकडून बेदम मारहाण; आरोपीसोबत दोरखंडाने बांधून काढली धिंड

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या अलीराजपूर जिल्ह्यात ही भयंकर घटना घडली आहे. एका कुटुंबाने बलात्कार पीडित मुलीला आधार देण्याऐवजी बेदम मारहाण केली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपीला आणि पीडितेला दोरखंडाने बांधून बेदम मारहाण केली आहे. तसेच पीडित मुलीची आरोपीसोबत धिंड देखील काढली आहे. संबंधित आरोपी हा पीडित मुलीच्या ओळखीचा असून तिच्या नात्यातील आहे. या मारहाणीच्या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. 

Web Title: Rape victim tied up with accused; Angry Urmila Matondkar said ... inhumanity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.